नितेश राणेंना मोठा दणका; दोन दिवसांची पोलीस कोठडी

नितेश राणेंना मोठा दणका; दोन दिवसांची पोलीस कोठडी l BJP Leader Nitesh Rane Remanded in Police-Custody till February 4
नितेश राणेंना मोठा दणका; दोन दिवसांची पोलीस कोठडी l BJP Leader Nitesh Rane Remanded in Police-Custody till February 4
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

शिवसैनिक संतोष परब (Shiv Sainik Santosh Parab) यांच्यावर हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांना दि. ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. (Nitesh Rane has been remanded in police custody till February 4)

पोलीस बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे; देशमुख यांच्या गौप्यस्फोटाने राजकारणात एकच खळबळ

या अगोदर त्यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला होता. तसेच, ते न्यायालयासमोर शरण देखील आले होते. याबाबत त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे.

नाट्यमय घडामाेडींनंतर OBC आरक्षण विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी; तिढा सुटण्याची चिन्हे

नितेश राणेंचे वकील सतीश मानेशिंदे (Nitish Rane’s lawyer Satish Maneshinde) यांनी दिलेल्या माहितीनुसार, “नितेश राणे यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेल्या संरक्षणामध्ये पाच दिवस शिल्लक असतानाही तपास अधिकाऱ्यासमोर शरण जात असल्याचं सांगत हायकोर्टातील जामीन अर्ज मागे घेतला आहे. त्यांना तपासाला सामोरे जाण्याची इच्छा आहे”. हायकोर्टानेदेखील अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली आहे, असे सांगितले होते.

See also  ठाकरे-शिंदेंच्या लढाईत शिवसेनेला मोठा फटका, ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपची 'चांदी'

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Maharashtra BJP 12 MLA Suspension : ठाकरे सरकारला झटका; भाजपाच्या 'त्या' १२ आमदारांचे निलंबन रद्द

Share on Social Sites