
मालेगाव । Malegaon :
मालेगाव मनपातील काँग्रेसच्या (Congress) सर्व २८ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत (Nationalist Congress Party (NCP) प्रवेश केला आहे. मालेगावमधील काँग्रेसचे सर्वेसर्वा माजी आमदार रशीद शेख (Former Congress MLA Rashid Shaikh) आणि महापौर ताहिरा शेख (Mayor Tahira Sheikh) यांनीही पक्षाला सोठचिठ्ठी दिली आहे. त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
आगामी महापालिका निवडणुकीच्या (Municipal Election) पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. मुंबईत पार पडलेल्या राष्ट्रवादीच्या पक्षाच्या कार्यक्रमात रशीद शेख, ताहिरा शेख यांच्यासह २८ नगरसेवक यांनी पक्षांतर केले.
Malegaon, Maharashtra: 27 corporators of the Congress party joined Nationalist Congress Party (NCP) today in the presence of party leader and Deputy CM Ajit Pawar. Malegaon Mayor Tahira Shaikh joined the party too. pic.twitter.com/XYVLLslEnw
— ANI (@ANI) January 27, 2022
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (State President Jayant Patil), नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ (Nashik Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.
Big News : मालेगावात राष्ट्रीय काँग्रेसला ‘दे धक्का’; २७ नगरसेवकांची एकाच वेळी सोडचिठ्ठी