‘दंगल पेटवणारे सहसा ब्राम्हण असतात’ : सुजात आंबेडकर

'दंगल पेटवणारे सहसा ब्राम्हण असतात' : सुजात आंबेडकर l Sujat Ambedkar controversial statement on MNS and BJP
'दंगल पेटवणारे सहसा ब्राम्हण असतात' : सुजात आंबेडकर l Sujat Ambedkar controversial statement on MNS and BJP
Share on Social Sites

मशिदींच्या भोंग्यांना 3 मे पर्यंत अल्टीमेटम, ऐकले नाही तर… राज ठाकरेंचा थेट इशारा

औरंगाबाद l Aurangabad :

वंचित बहूजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) नेते तथा प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचे पुत्र सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी पुन्हा एकदा मनसेवर (Maharashtra Navnirman Sena MNS) टीका केली आहे. यासोबतच त्यांनी एक वादग्रस्त विधान (Sujat Ambedkar Controversial Statement) ही केल आहे.

बापरे! अख्या महाराष्ट्रात 8 तास राहणार अंधार?; आता घरातही नसणार लाईट

अमित राज ठाकरे (Amit Raj Thackeray) यांना हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) म्हणण्यासाठी पर्सनल ईव्हीटेशन दिलं नव्हतं, अशा शब्दांत त्यांनी मनसेवर (MNS) टीका केली आहे. तर दंगल पेटवणारे हे उच्चवर्णीय उच्चवर्गीय ब्राम्हण (Brahmins) असतात, असं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात असे सुजात आंबेडकर म्हणाले आहे. औरंगाबाद येथील एमजीएम महाविद्यालयात (MGM College, Aurangabad) आयोजित एका कार्यक्रमासाठी आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुजात आंबेडकर यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज ठाकरे यांना दंगल पेटवायची असेल तर स्वतःच्या मुलाला आधी रस्त्यावर उतरवा, असं म्हणत स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवणार नसाल तर बहुजन पोरांनाही उतरवू नका असा सल्लाही सुजात आंबेडकर यांनी राज ठाकरेंना दिला आहे.

पुढे सुजात म्हणाले की, आतापर्यंत आपण कितीही दंगली बघितल्या बाबरी मस्जिदची (Babri Masjid) दंगल असो, भीमा कोरेगावची (Bhima Koregaon) दंगल असो, आपण हेच बघितले की दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय आणि उच्चवर्गीय ब्राह्मण असतात. त्यांच्या वक्तव्यानंतर प्रवाहित होऊन दंगलध्ये जे उतरतात, प्रत्यक्षात ते बहूजन मुलं असतात.

SBI युजर्स सावधान, एका क्लिक आणि बँक खाते होईल रिकामे; Yono SMS द्वारे होतोय नवीन Scam

राज ठाकरेंना माझे एवढंच म्हणणे होते की, तुम्हाला दंगल पेटवायची असेल किंवा हनुमान चालिसा म्हणायला लावायची असेल तर बहूजन मुलांच्या आधी स्वतःच्या मुलाला रस्त्यावर उतरवावे, असंही सुजात यांनी म्हटलं आहे.

मनसेसह भाजपवरही टीका (Criticism of BJP along with MNS)

यावेळी सुजात यांनी भाजप (BJP) आणि मनसेवर बोचरी टीका केली आहे. लोकांच्या भूकमारीचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न असे सर्व आश्वासन देऊन भाजप सत्तेत आला. पण सत्तेत आल्यावर यावर कुणीही बोलायला तयार नाही. कोरोना (Corona) काळात सर्व आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली होती. त्यावर कुणीही बोलत नाही. असे असतानाही जर भाजप किंवा राज ठाकरे असेच हिंदू-मुस्लिम दंगलीवर (Hindu-Muslim Riots) बोलत असेल तर त्याचा सरळसरळ असा अर्थ होतो की, येथील लोकांना भावनिक धर्माच्या प्रश्नांमध्ये अडकून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. जेणेकरून महत्वाच्या प्रश्नांकडे त्यांचे लक्ष जाऊ नयेत, असं म्हणत सुजात आंबेडकर यांनी मनसे आणि भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

…अन् किर्तनकार बाबाचा Porn Video असा झाला तुफान व्हायरल; खरं कारण आलं समोर

See also  उद्धवा, अजब तुझे… पोलीस पदन्नोतीच्या आदेशाला अवघ्या 12 तासांत स्थगिती; कुणाचं प्रमोशन थांबवलं?

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites