मुंबई l Mumbai :
राज्यातील पोलीस बदल्यांची यादी अनिल परबच (Anil Parab)आपल्याकडे द्यायचे असा खळबळजनक खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांनी केला आहे. देशमुख यांनी दिलेला जबाब ईडीच्या चार्जशीटमध्ये (ED Chargsheet) नोंदविण्यात आला आहे. देशमुख यांच्या या नव्या गौप्यस्फोटामुळे अनिल परब यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अतिरिक्त मुख्य सचिव (गृह) (Additional Chief Secretary (Home) या पदावर असताना तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख हे माझ्याकडे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांसाठी अनधिकृत याद्या पाठवायचे, असा गौप्यस्फोट सीताराम कुंटे (Sitaram Kunte) यांनी ईडीला दिलेल्या जबाबात म्हटले होते.
नाट्यमय घडामाेडींनंतर OBC आरक्षण विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी; तिढा सुटण्याची चिन्हे
सीताराम कुंटेंचा जबाब अनिल देशमुख यांच्यासाठी मोठा धक्का असल्याचं मानले जात होते. आता अनिल देशमुख यांनी अनिल परब यांचे नाव घेऊन प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
ईडीने केलेल्या तपासानंतर दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये अनिल देशमुख यांना एका कॅबिनेट मंत्र्याने बदल्यांची यादी दिली होती असे नमूद केले. त्यावर अनिल देशमुखांना विचारण्यात आले असता त्यांनी उघडपणे अनिल परब यांचे नाव घेतले आहे. “मला कुठल्याही व्यक्तीने यादी दिलेली नव्हती, तर अनिल परब यांनी यादी दिली होती. तिच यादी अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती”, असे अनिल देशमुख यांनी जबाबात नमूद केले आहे.
“बदल्यांसंदर्भातील यादी गृह मुख्य सचिवांकडे द्यावी लागते. त्यानुसार ती दिली होती. या यादीनुसारच बदली करावी. पण जे नियमात बसत असेल तेच करा नाहीतर नावे बाहेर काढा असंही तत्कालीन सचिवांना सांगितले होते”, असे स्पष्टीकरण देखील अनिल देशमुख यांनी जबाबात दिले आहे.
चिथावणीखोर ‘सातवी पास भाऊ’ची न्यायालयात माफी; ‘या’ तारखे पर्यंत पोलीस कोठडी