मुंबई l Mumbai (ईखबरबात न्युज नेटवर्क) :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) मार्च-एप्रिल 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (ता. 8) दुपारी एक वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. (HSC Result 2022 MSBSHSE 12th Result)
राज्याचा 12वीचा निकाल 94.22 टक्के; कोकण विभाग अव्वल, पाहा कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल
त्यामुळे निकालाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या लाखो विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांची प्रतीक्षा बुधवारी अखेर संपणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिका (HSC Marksheet) त्यांच्या उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत दि. 17 जून रोजी दुपारी तीन वाजता वितरित केल्या जाणार आहेत. (Maharashtra HSC Results 2022)
Maharashtra HSC Result 2022: महाराष्ट्र बोर्ड के कक्षा 12वीं का रिजल्ट आज दोपहर 1 बजे होगा जारी, https://t.co/lqMC0WZ2pj पर देख सकेंगे परिणाम
मुंबई: महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी एंड हायर सेकेंडरी एजुकेशन (MSBSHSE)के कक्षा 12वीं बोर्ड परीक्षा 2022 के रिजल्ट आज दोपहर 1 … pic.twitter.com/HbFuFvA6YM
— Fourth Screen Education (@fourthscreenedu) June 8, 2022
राज्य मंडळामार्फत झालेल्या या परीक्षेसाठी राज्यातील 14 लाख 85 हजार 191 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी आठ लाख 17 हजार 188 विद्यार्थी आणि सहा लाख 68 हजार 3 विद्यार्थिनी आहेत. पुणे (Pune), नागपूर (Nagpur), औरंगाबाद (Aurangabad), मुंबई (Mumbai), कोल्हापूर (Kolhapur), अमरावती (Amravati), नाशिक (Nashik), लातूर (Latur), कोकण (Konkan) या नऊ विभागीय शिक्षण मंडळामार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय गुण बुधवारी दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाइन पाहता येणार आहेत. राज्य मंडळाच्या बारावीच्या निकालाची अधिकृत घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (School Education minister Varsha Gaikwad) यांनी (दि. 07)मंगळवारी दुपारी आपल्या अधिकृत ट्विटर (Twitter) आणि फेसबुक (Facebook) अकाउंटवरून केली.
परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण राज्य मंडळाने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील आणि या माहितीची प्रत (प्रिंट आउट) विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या निकालासोबत इतर सांख्यिकीय माहिती ‘www.mahresult.nic.in’ या संकेतस्थळावर, तर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्रित निकाल ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्य मंडळाने दिली आहे.
राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता #बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी १ वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर होणार.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ :https://t.co/8vfcQdcFHwhttps://t.co/Yytha6HRCihttps://t.co/TFjSlqSKO1
@DDNewslive @DDNewsHindi @VarshaEGaikwad
#HSC #results— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) June 8, 2022
बारावीचा निकाल कोठे पाहायचा? (Where to check 12th result?)
– www.mahresult.nic.in
– www.hscresult.mkcl.org
– https://hsc.mahresults.org.in
MPSC Result : UPSC नंतर आता MPSC परिक्षेचा निकाल जाहीर; पाहा यादी
गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत
ऑनलाइन निकालानंतर परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विशिष्ट विषयात त्यांनी संपादित केलेल्या गुणांची गुण पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘http://verification.mh-hsc.ac.in’ अधिकृत संकेतस्थळावरून स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. यासाठी आवश्यक अटी व सूचना संकेतस्थळावर दिल्या आहेत. गुण पडताळणीसाठी दि. 10 ते 20 जूनपर्यंत, तर छायाप्रतीसाठी दि. 10 ते 29 जूनपर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येईल.
UPSC 2021 चा निकाल जाहीर, यंदा मुलींची बाजी… पाहा ‘टॉपर्स’ची यादी
पुनर्मूल्यांकन कसे व कधी?
बारावीच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून दिलेल्या नमुन्यात शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल, त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा. बारावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/गुणसुधार योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.
पुरवणी परीक्षेसाठी…
जुलै-ऑगस्ट 2022 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी दि. 10 जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे.
औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर आता करू शकतो पण…;उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
