राज्याचा 12वीचा निकाल 94.22 टक्के; कोकण विभाग अव्वल, पाहा कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल

राज्याचा 12वीचा निकाल 94.22 टक्के; कोकण विभाग अव्वल, पाहा कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल l Maharashtra HSC 12th Result 2022 declared Check Updates
राज्याचा 12वीचा निकाल 94.22 टक्के; कोकण विभाग अव्वल, पाहा कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल l Maharashtra HSC 12th Result 2022 declared Check Updates
Share on Social Sites

हुश्शह! निकाल तर लागला.. पण आता पुढे काय? ‘हे’ आहेत 10वी नंतरचे ‘बेस्ट करियर ऑप्शन’

पुणे l Pune (ई खबरबात न्युज नेटवर्क) :

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने ( Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education ) बारावीच्या निकालाची आकडेवारी जाहीर केली आहे. राज्याचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आपला निकाल हा दुपारी एक वाजल्यानंतर पाहता येणार आहे. mahahsscboard.in, mahresult.nic.in या वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे.

विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा-कनिष्ठ महाविद्यालयातर्फे दि. 17 जूनला गुणपत्रिका दिल्या जातील. यंदाचा राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे. जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.31 टक्क्यांनी कमी झाला आहे.

धाकधुक वाढली! काही वेळात 12वीचा निकाल… कुठे-कुठे पाहता येणार?; गुणपडताळणी, उत्तरपत्रिकेची छायाप्रत कधी मिळणार?, पुनर्मूल्यांकन कसे व कधी?, पुरवणी परीक्षेसाठी असे असेल नियोजन; वाचा सविस्तर

मागील वर्षी हा निकाल 99.53 टक्के लागला होता. यंदा परीक्षा विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये झाली होती. सर्व विभागीय मंडळांमधून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा सर्वाधिक 97.22 टक्के निकाल लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (Mumbai Division) 90.91 टक्के आहे.

राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी, कोकण विभाग अव्वल तर नाशिक विभाग शेवटून ‘पहिला’, असा आहे विभागनिहाय निकाल

विभागनिहाय निकाल

कोकण (Konkan) – 97.22 टक्के, पुणे (Pune)- 93.61 टक्के, कोल्हापूर (Kolhapur) – 95.07 टक्के, अमरावती (Amravati) – 96.34 टक्के, नागपूर (Nagpur) – 96.52 टक्के, लातूर (Latur) – 95.25 टक्के, मुंबई (Mumbai) – 90.91 टक्के, नाशिक (Nashik) – 95.03 टक्के, औरंगाबाद (Aurangabad) – 94.97 टक्के. या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 95.35 टक्के लागला आहे. तर मुलांचा निकाल 93.29 टक्के लागला आहे. मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

औरंगाबादचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर आता करू शकतो पण…;उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

See also  Lumpy Virus : 'लंपी व्हायरस' नेमकं आहे तरी काय?, कसा पसरतो?, लक्षणं काय? 'अशी' घ्या प्राण्यांची काळजी

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites