नाशिक l Nashik :
महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Maharashtra Tourism Minister Aditya Thackeray) हे मागील बऱ्याच काळापासून राज्याचे इलेक्ट्रीक व्हेइकल धोरण (Electric Vehicle Policy) म्हणजेच इलेक्ट्रीक वाहनांसंदर्भातील नियम निश्चिती, अधिक वापर वाढण्यासंदर्भातील काम करत आहेत.
मध्यंतरी त्यांनी पुण्यामधील काही कंपन्यांच्या कारखान्यांना भेटही दिली होती. मात्र आता आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे सोनी टीव्हीवरील शार्क टँक इंडियावरील (Shark Tank India on Sony TV) एका कार्यक्रमामध्ये आलेल्या इलेक्ट्रीक बाईक (Electric Bike) बनवणाऱ्या नाशिकमधील कंपनीच्या कारखान्यात पोहचले.
I learned about the Nashik-based @revampmoto through a clip from @sharktankindia a few days ago, who manufacture made in 🇮🇳 EV bikes. Today, while in Nashik, met with the young team to see how we can work together with MIDC to scale up their production and promote the use of EV pic.twitter.com/2zoefrPtJ2
— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 28, 2022
आज दि. २८ जानेवारी रोजी आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्या दरम्यान त्यांनी रिव्हॅम्प (Revamp) या कंपनीला भेट दिली. आपल्याला शार्क टँक इंडिया (Shark Tank India) मधील क्लिपमध्ये या कंपनीबद्दल माहिती मिळाली. ही कंपनी पूर्णपणे भारतीय बनावटीच्या इलेक्ट्रीक बाईक्स बनवते, असे आदित्य आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहे.
“काही दिवसांपूर्वीच मला शार्क टँक इंडियामधील एका क्लिपमधून नाशिकमधील रिव्हॅम्प या कंपनीबद्दल कळले. ही कंपनी पूर्णपणे मेड इन इंडिया (Made in India) इलेक्ट्रीक बाईक्स बनवते. आज मी नाशिकमध्ये असताना या कंपनीच्या टीमला भेटलो. या कंपनीकडून निर्माण केल्या जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि इलेक्ट्रीक गाड्यांचा वापर वाढवण्यासाठी आपण एमआयडीसोबत (MIDC) एकत्र काम कसे करु शकतो, याबद्दल या टीमशी चर्चा केली,” असे आदित्य यांनी म्हटले आहे.
It's an honour to have your support @AUThackeray !@ShivSena @CMOMaharashtra https://t.co/RkLZUVaTLo
— Revamp Moto (@revampmoto) January 28, 2022
कंपनीच्या ट्विटर हॅण्डलवरुनही आदित्य ठाकरेंचे आभार कंपनीने मानले आहे. “आदित्य ठाकरे तुमच्याकडून पाठिंबा मिळणे हा सुद्धा आमचा गौरव आहे,” असे कंपनीने म्हटले आहे.