
नवी दिल्ली l New Delhi :
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या २०२१ चा निकाल जाहीर झाला आहे. (Union Public Service Commission UPSC) यंदा पहिल्या तीन टॉपर्स मुली आहेत. श्रुती शर्माने (Shruti Sharma) पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, द्वितीय अंकिता अग्रवाल (Ankita Agarwal) आणि तृतीय क्रमांकांवर गामिनी सिंगला (Gamini Singla) यांनी जागा पटकावली आहे. (UPSC declares 2021 Civil Services Exam results) महाराष्ट्रातून (Maharashtra) प्रियंवदा अशोक म्हाडदळकर (Priyanvada Ashok Mhaddalkar) ही पहिली आली आहे. तिची ऑल इंडिया रँक 13 आहे. टॉप 15 मध्ये देसणारं हे एकमेव मराठी नाव आहे.
अंतिम निकाल लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर पाहता येईल. यावेळी एकूण 685 उमेदवार या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. (UPSC 2021 Results)
UPSC declares 2021 Civil Services Exam results
Shruti Sharma, Ankita Agarwal and Gamini Singla secure top three ranks, respectively pic.twitter.com/b0x9N0IomU
— ANI (@ANI) May 30, 2022
यावर्षी परीक्षा दि. 5 जूनला पार पडणार
या वर्षी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स परीक्षा दि. 5 जून रोजी पार पडणार आहे. (UPSC Civil Services Prelims Exam date) या परीक्षेसाठी UPSC ने उमेदवारांना OMR शीट कशी भरायची ते सांगितले आहे. यूपीएससीनं OMR शीटच्या प्रतिमा (फोटो) शेअर करून उमेदवारांना अर्ज भरण्याचा योग्य आणि चुकीचा मार्ग समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस प्रीलिम्स परीक्षेत बसलेल्या उमेदवारांनी वेबसाइटला भेट द्यावी आणि संपूर्ण तपशील तपासावा, असंही आवाहन त्यांनी केले आहे.
#upsc #civilservicesmains2021 top 4 rank holders are women and a total of 8 women amongst top 20. What more proof one needs to show that women can excel anywhere provided they are given equal opportunity including education. pic.twitter.com/3uJyzEDxtR
— Víkrám (@gvicks) May 30, 2022