नवाब मलिकांच्या मालमत्तेसंदर्भात नाशकात ईडीची धाड

नवाब मलिकांच्या मालमत्तेसंदर्भात नाशकात ईडीची धाड l Enforcement Directorate ED inquiry in Nawab Malik case in Nashik
नवाब मलिकांच्या मालमत्तेसंदर्भात नाशकात ईडीची धाड l Enforcement Directorate ED inquiry in Nawab Malik case in Nashik
Share on Social Sites

राज्यात मास्कमुक्ती झाली हो!

नाशिक । Nashik :

कारागृहात शिक्षा भोगत असलेले राज्याचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Minority Welfare Minister and NCP spokesperson Nawab Malik) यांच्याशी संबंधित व्यवहाराशी चौकशी करण्यासाठी ईडीने थेट नाशिकमध्ये (ED Raid Nashik) धडक मारल्याची माहिती समोर आली आहे.

नाशिककरांनो! उद्याच करा वाहनाच्या टाक्या फुल्‍ल, अन्यथा…

प्राप्त माहितीनुसार नाशिकच्या अंबड परिसरातील (ED Raid in Ambad) काही भंगार व्यावसायिकांची ईडीने कसून चौकशी केली आहे. त्यामुळे एकच चर्चा सुरू आहे. तथापि, या प्रकरणी माहिती द्यायला पोलीस आणि प्रशासनाने मौन बाळगणे पसंत केले आहे.

अल्पसंख्याक कल्याण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना अखेर ईडीने अटक केलीय. नवाब मलिकांची अंडरवर्ल्डशी निगडित काही मालमत्ता आहे का, याची चौकशी ईडीकडून सुरू होती. दाऊदचा भाऊ इकबाल कासकर (Iqbal Kaskar) ईडीच्या कोठडीत आहे. त्याची चौकशी झाली आहे.

JOB ALERT : नाशकातील ‘या’ मोठ्या कंपनीत 500हून अधिक जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती

या चौकशीत कासकर आणि नवाब मलिक यांच्या कंपनीत जमीन व्यवहार झाल्याचे काही पुरावे ईडीला मिळाल्याचे समजते. याप्रकरणात ईडीने दोन बिल्डरांनाही समन्स पाठवले आहे. याप्रकरणातच मलिक यांना अटक करण्यात आलीय. मलिक यांचा स्वतःचा भंगारचा व्यवसाय आहे. त्या नाशिकमध्ये व्यवसायाशी निगडित असलेल्या अनेकांची ईडीने चौकशी केल्याचे समजते.

‘दोघांना’ हेल्मेट सक्ती करणारे नाशिकचे पोलिस आयुक्तांनी मागितली बदली

भंगार व्यापार्‍यांकडे धडक (Strike to scrap dealers)

नाशिकच्या अंबड परिसरात भंगार व्यापार्‍यांची दुकाने आहेत. या ठिकाणी ईडीने अचानक धडक देत अनेक व्यापार्‍यांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. या व्यापार्‍यातील अनेकांचा थेट नवाब मलिक यांच्याशी संबंध होता. त्यांच्याशी यांचे व्यवहार सुरू असायचे. त्यामुळे ईडीने येथे येऊन झाडाझडती घेतल्याचे समजते. याप्रकरणी अजूनपर्यंत तरी कोणाला ताब्यात किंवा अटक केल्याचे वृत्त नाही.

यंदाचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरणाचा मान नाशिकला; राज्यपाल, मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित

See also  Video : ED भाजपाचं 'ATM' बनलंय; संजय राऊतांचा घणाघात

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  संतूरचे सूर मुके झाले... पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा कालवश

Share on Social Sites