नाशिक । Nashik :
कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वामुळे तीन वर्षांपासून रखडलेले कृषी क्षेत्रातील विविध पुरस्कारांचे वितरण यंदा होणार असून हा सोहळा आयोजित करण्याचा मान नाशिक जिल्ह्याला मिळाला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari), मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Udhhav Thackeray) यांच्यासह अनेक मंत्री या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याने कृषी विभागाचे (Agriculture Department) आतापासूनच नियोजन सुरू झाले आहे. ज्याठिकाणी हा सोहळा होणार आहे, तो नाशिक जिल्हा राज्याच्या कृषी मंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांचा आहे, हे विशेष!
पंजाबराव देशमुख कृषिरत्न (Punjabrao Deshmukh Krishiratna), वसंतराव नाईक कृषिभूषण (Vasantrao Naik Krishi Bhushan), जिजामाता कृषिभूषण (Jijamata Krishi Bhushan), वसंतराव नाईक शेतीमित्र (Vasantrao Naik Shetimitr) असे विविध पुरस्कार दरवर्षी वितरीत केले जातात. त्यासाठी तालुकास्तरावरून जिल्हा पातळीवर तर जिल्हास्तरावर विभागीय पातळीवर प्रस्ताव सादर केले जातात. त्यानंतर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पुरस्कारार्थींची निवड होते.
JOB ALERT : नाशकातील ‘या’ मोठ्या कंपनीत 500हून अधिक जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती
राजभवनात भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करून राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारार्थींचा सन्मान करण्यात येतो. तीन वर्षांपासून पुरस्कारार्थींची निवड झाली पण, पुरस्काराचे वितरणच होऊ न शकल्याची बाब उजेडात आली आहे. कोरोनाचे सावट पुरस्कार वितरण सोहळ्याआड आले होते. दरम्यानच्या काळात विविध प्रकारच्या निर्बधांमुळे सोहळा आयोजित करणे शक्य झाले नव्हते.
यावर्षी मात्र तीन वर्षांपासून रखडलेले पुरस्कार एकाच वेळी देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठीचा सोहळा राजभवनात नव्हे तर नाशिकमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. राज्यभरातील एकूण 198 पुरस्कारार्थींचा गौरव या सोहळ्यात होणार आहे. यात नाशिक जिल्ह्यातील जवळपास 22 पुरस्कारार्थींचा समावेश आहे.
या सोहळ्याला दस्तुरखुद्द राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वीही नाशिकला राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्याचा मान मिळाला होता. त्यावेळी हा सोहळा आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या (MUHS) प्रांगणात घेण्यात आला होता. आता दुसर्यांदा मान मिळणार असून संपूर्ण जबाबदारी कृषी विभागाच्या अधिकार्यांवर टाकण्यात आली आहे.
ठक्कर डोमवर रंगणार सोहळा (Ceremony to be held at Thakkar Dome, Nashik)
साधारणत: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुरस्कार वितरण सोहळा निश्चित करण्यात आला आहे. राज्यपाल आणि मुख्यमंत्रीही उपस्थित राहणार असल्याचे निश्चित झाले आहे. राज्यस्तरीय सोहळा असल्याने होणारी गर्दी लक्षात घेऊन त्यासाठी त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील ठक्कर डोम हे स्थळ अंतिम करण्याचे काम सुरू आहे. संपूर्ण राज्यभरातील पुरस्कारार्थी येणार असल्याने त्यांचे भोजन आणि निवासाची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध मंत्रीही येणार असल्याने त्यादृष्टिनेही नियोजन करण्याचे काम आतापासूनच सुरू झाले आहे.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
क्या बात हैं.. आता WhatsApp वरुनही चित्रपट, वेबसिरिज पाठवता येणार
Guardian Ministers of Maharashtra : हुश्श! जिल्ह्याला पालकमंत्री मिळाले, ‘हे’ अस...
Nashik Crime : 'ताे' हाडांचा सांगाडा डाॅ. सुवर्णा वाजे यांचाच; खून झाल्याचे निष्...
WhatsApp New Features : अरे व्वा! गुपचूप WhatsApp ग्रुप सोडता येणार, ऑनलाईन स्टे...