
मुंबई l Mumbai :
मान्सून (Monsoon 2022) यंदा लवकर येणार म्हणून वेळेआधीच मान्सूनकडे डोळे लावून बसलेल्या आणि तसा अंदाज वर्तवणारे सर्वच जण धाडकन जमिनीवर आले आहेत. यंदा मान्सून महाराष्ट्रात काहीसा लवकरच दाखल होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. (Monsoon delay in Maharashtra)
Andharban trek is an ideal monsoon trek, a dense forest located near Pimpri in Maharashtra. This is an evergreen Sahyadri forest, covered in mist and dreamy forest landscape in the Tamhini Ghats.
Credit – unexplored_konkan#MaharashtraUnlimited pic.twitter.com/YOX2doNhsZ— Maharashtra Tourism (@maha_tourism) June 6, 2022
हा अंदाज कासीचा चुकला असून आता दि. 12 ते दि. 13 ऑक्टोबर रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यात आहे, असा नवा मुहूर्त वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे मान्सून लांबणीवर (Monsoon 2022 Arrival Likely Delayed in Maharashtra) पडला की काय? अशी चिंता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मान्सून गोव्याच्या (Goa) सीमेवरच रेंगाळल्याचेही बोलले जात आहे. खास करुन कारवार, चिकमंगळूर या कर्नाटक-गोवा (Karnataka-Goa) सीमाभागात मान्सून जरा अधिकच रेंगाळताना दिसतो आहे. (Monsoon 2022 arrival likely delayed rain lingered on the border of Goa it is now expected to arrive in Maharashtra on June 12, 13)
‘गेम’चा नाद लई बेक्कार! बापाच्या मृत्यु पश्चात माय माऊलीने 36 लाख जमवले पण मुलाने झटक्यात उडवले
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या उन्हाच्या झळांनी काहीली वाढवली आहे. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra), कोकण (Konkan), उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) या भागांमध्ये उकाडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. तर विदर्भात (Vidarbha) उष्णतेचा तडाखा कायम आहे. या तापलेल्या वातावरणात दिलासा देण्यासाठी मान्सूनपूर्व सरींचा शिडकाव येत्या एक-दोन दिवसांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ITCZ further moved northwards. Monsoon likely to progress further into north Bay of Bengal and parts of #Maharashtra in next 4-5 days.#Monsoon2022
Image : https://t.co/1S8BwJP8ML pic.twitter.com/oOm8EMpsH1— 𝐃𝐫. 𝐏𝐫𝐚𝐝𝐞𝐞𝐩 𝐊𝐮𝐬𝐡𝐰𝐚𝐡𝐚 (@pkusrain) June 6, 2022
गेल्या अनेक वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाचे चटके काहीसे अधिकच जाणवले आहेत. त्यामुळे मनुष्य, प्राणी-पक्षी आणि धरतीही जणू ‘पड रं पाण्या… पड रं पाण्या… कर पाणी पाणी..’ हे गीतच गात होते. हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजामुळे नाही म्हणायला काहीसा दिलासा मिळाला. यंदा मान्सूनचे आगमन लवकर होणार अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
भीषण दुर्घटना! भाविकांची बस दरीत कोसळली; 26 जण जागीच ठार, 3 जखमी
ही शक्याता ऐकूनही बळीराजा (Baliraja) आणि अनेकांना आनंद झाला. सर्वांनी मान्सूनसाठी ढगांकडे डोळे लावले खरे. पण मान्सूनने हुलकावणी दिली ती दिलीच. खरे तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे मान्सून दि. 7 जून म्हणजे आजच दाखल होणे अपेक्षीत होते. मात्र तसे कोणतेच चिन्ह सध्या तरी दिसत नाही. परिणामी आता नव्या शक्यतेनुसार दि. 12 ते 13 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होईल असे सध्यातरी अपेक्षीत आहे.
…म्हणून ‘त्याने’ रचला उद्योजक आहेर यांचा हत्येचा कट; नाशिक पोलीस आयुक्तांनी केला खुनाचा उलगडा