राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी, कोकण विभाग अव्वल तर नाशिक विभाग शेवटून ‘पहिला’, असा आहे विभागनिहाय निकाल

राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी, कोकण विभाग अव्वल तर नाशिक विभाग शेवटून 'पहिला', असा आहे विभागनिहाय निकाल | Maharashtra SSC result 2022 declared 96.94% pass, check details
राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी, कोकण विभाग अव्वल तर नाशिक विभाग शेवटून 'पहिला', असा आहे विभागनिहाय निकाल | Maharashtra SSC result 2022 declared 96.94% pass, check details
Share on Social Sites

हुश्शह! निकाल तर लागला.. पण आता पुढे काय? ‘हे’ आहेत 10वी नंतरचे ‘बेस्ट करियर ऑप्शन’

मुंबई l Mumbai :

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने (State Board of Secondary and Higher Secondary) घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल (SSC Result 2022) जाहीर झाला आहे. राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला. 99.27 टक्के मिळवत कोकण विभागाने (Konkan division) निकालात बाजी मारली. विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल आज (दि. 17) दुपारी 1 वाजेपासून जाहीर झाला.

https://twitter.com/NMMConline/status/1537810914761654272

येथे पाहा निकाल (SSC see results here)

www.mahresult.nic.in
http://sscresult.mkcl.org
https://ssc.mahresults.org.in

या संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजेपासून निकाल प्रसिद्ध झाला. सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित गुण या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत तसेच या माहितीची प्रत (प्रिंटआऊट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

School reopen in Maharashtra : शाळेची घंटा वाजली! राज्यात आजपासून किलबिलाट

अशी करा गुणपडताळणी

परीक्षेचा निकाल ऑनलाइन स्वरूपात जाहीर झाल्यावर ज्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणी (Verification), पुनर्मूल्यांकन (Re-Evaluation), उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती (Photocopies of answer sheets) हव्या असतील, त्यांनी दि. 20 जूनपासून मंडळाच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार ऑनलाईन अर्ज करायचे आहेत, अशी माहिती मंडळाने दिली आहे.

CMA सीएमए : कॉमर्स/वाणिज्य क्षेत्रात यशाचं शिखर गाठण्यासाठी ‘गेटपास’

विभागनिहाय निकाल (Department wise results)

पुणे (Pune): 96.96%
नागपूर (Nagpur): 97%
औरंगाबाद (Aurangabad): 96.33%
मुंबई (Mumbai): 96.94%
कोल्हापूर (Kolhapur): 98.50%
अमरावती (Amravati): 96.81%
नाशिक (Nashik): 95.90%
लातूर (Latur): 97.27%
कोकण (Konkan): 99.27%
धुळे (Dhule) : 95.43%

राज्याचा 12वीचा निकाल 94.22 टक्के; कोकण विभाग अव्वल, पाहा कोणत्या विभागाचा किती टक्के निकाल

यंदाही मुलींचीच बाजी

दरवर्षीप्रमाणे यंदाही दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. यावर्षी 97.96 टक्के मुली पास झाल्या. तर, 96.06 टक्के मुले पास झाले. म्हणजेच परीक्षा देणाऱ्या मुलांपेक्षा 1.09 टक्के अधिक मुली पास झाल्या.

16 लाख 36 हजार परीक्षार्थी (16 lakh 36 thousand examinees in SSC)

यंदा 2021-22 या वर्षाची दहावीची परीक्षा दि.15 मार्च ते दि. 4 एप्रिल या दरम्यान घेण्यात आली होती. राज्यभरातील नऊ विभागीय मंडळांच्या माध्यमातून 16 लाख, 36 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये 8 लाख, 89 हजार विद्यार्थी तर 7 लाख, 49 हजार विद्यार्थिनींचा समावेश होता. परीक्षेसाठी राज्यभरात एकूण 22 हजार 911 माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. 5 हजार 50 मुख्य केंद्रांवर दहावीची परीक्षा झाली होती.

Video : तरुणांना सैन्‍य भरतीची सुर्वणसंधी; सरकार कडून ‘अग्‍निपथ’ची घोषणा, पहा काय नेमकी योजना?

औरंगाबाद विभागाचा निकाल 96.33% (Aurangabad division result 96.33%)

औरंगाबाद विभागाचा निकाल 96.33 टक्के लागला. औरंगाबाद विभागातून 1 लाख 77 हजार 327 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 1 लाख 70 हजार 831 पास झाले. 6 हजार 500 विद्यार्थी नापास झाले. नापास विद्यार्थ्यांचे प्रमाण 3.67% आहे. जिल्ह्यात औरंगाबादचा निकाल 97.1% आहे. बीड (Beed) 97.20% प्रथम स्थानी आहे. जालना (Jalna) 95.44%, परभणी (Parbhani) 95.37%, हिंगोली (Hingoli) 94.77% असा निकाल लागला.

नाशिक विभागाचा निकाल 95.90%

नाशिक (Nashik) विभाग सर्वात शेवटी असल्याचं समोर आलं आहे. नाशिक विभागाचा निकाल 95.90% इतका लागला आहे. यावर्षी उत्तीर्ण विद्यार्थीनी 97.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर उत्तीर्ण होणाऱ्या मुलांचं प्रमाण 96.06 टक्के आहे.

धुळे जिल्ह्याचा 95.43 टक्के निकाल (95.43 percent result of Dhule district)

धुळे महानगरातून सर्वाधिक 96.66 टक्के निकाल लागला असून त्या खालोखाल शिरपूर तालुका (Shirpur taluka) वरचढ ठरला आहे. या तालुक्याचा 96.61 टक्के निकाल लागला आहे. धुळे जिल्ह्यातून 28 हजार 334 विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. यात 15862 विद्यार्थी तर 12472 विद्यार्थिनींचा समावेश आहे. यातून 15605 विद्यार्थी तर 12305 विद्यार्थिनी अशा सत्तावीस हजार नऊशे दहा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यातून 26 हजार 635 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 14 हजार 784 विद्यार्थी तर 11 हजार 851 विद्यार्थिनींचा समावेश आहे. जिल्ह्यांमधून उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी 94.4 असून यात विद्यार्थिनींची टक्केवारी 96. 31 अशी आहे.

आदिवासीबहुल असलेला नंदुरबार (Nandurbar) जिल्हा सर्वात कमी म्हणजे 94.97 टक्क्यांसह चौथ्या क्रमांकावर आहे. जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातून यावर्षी 57 हजार 88 विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ झाले होते. यातून 54 हजार 646 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी 27 हजार 241 विद्यार्थी हे विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहे. तर 19 हजार 188 विद्यार्थी हे प्रथम श्रेणीत 7 हजार 253 द्वितीय श्रेणीत तर 963 विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

See also  पैगंबर मोहम्मद प्रकरण भोवलं; भाजपच्या नुपूर शर्मांसह 'या' 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  'आप'ची 'मान' उंचावणारा Punjab King; कॉमेडियन टू CM कसा आहे 'भगवंत' यांचा प्रवास

Share on Social Sites