
अहमदनगर । Ahmednagar :
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Senior social activist Anna Hazare) यांनी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा (Union Co-operation Minister Amit Shah) यांच्याकडे सहकार क्षेत्रातील चौकशी संबंधीची एक मागणी जाहीरपणे केली आहे.
राज्यातील सहकारी साखर कारखान्यांच्या (Co-operative Sugar Factory) विक्रीत २५ हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा हजारे यांचा आरोप आहे. याची चौकशी आता केंद्रीय सहकार मंत्रालयाने (Union Co-operation Ministry) सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी, अशी मागणी हजारे यांनी केली आहे.
अमित शहा यांना हजारे यांनी एक पत्र पाठवले आहे. दरवेळी विविध कारणांसाठी आंदोलनाचा इशारा देणारे पत्र लिहिणार्या हजारे यांनी आता केंद्र सरकारकडे राज्यातील या मोठ्या घोटाळ्यामध्ये लक्ष घालण्याची मागणी करणारे पत्र लिहिले आहे.
महाराष्ट्रातील अनेक पक्षांचे लोक आणि अधिकार्यांनी भ्रष्टाचार करून शेतकर्यांनी आपल्या भाग भांडवल आणि जमिनी देऊन उभे केलेले सहकारी साखर कारखाने कवडीमोल भावाने संगनमताने विकत घेतले आहेत.
त्यातून अंदाजे २५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे. सहकार क्षेत्र मोडीत काढून खासगीकरण वाढीला लावण्याचा हा प्रकार असून त्याची चौकशी करून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी हजारे यांनी पत्रातून केली आहे.
See also देशातली पहिली BSL-3 लॅब नाशिकमध्ये; २५ कोटी खर्चून निर्मिती, काय काम, महामारीत महत्त्व कसे?