चोपडा l Chopda :
जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील वाळकी (Valaki, Chopda) याठिकाणी एका शेतकऱ्याने चक्क साडेतीन एकरावर अफूची शेती (3.5 acre Opium farming in Chopda) लावली आहे.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी (Police raid Opium farming) केली असता, संबंधित प्रकार पाहून पोलीसही अवाक झाले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मागील दोन दिवसांपासून पोलीस अफूचे पीक उपटण्याचे काम करत आहे.
आतापर्यंत एक हजार गोणी अफू उपटला आहे. अजूनही अंदाजे 500 गोणी अफू बाकी असल्याची माहिती पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. या अफूची किंमत जवळपास आठ कोटी रुपयांच्या घरात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
प्रकाश सुधाकर पाटील (Prakash Sudhakar Patil) असे अफूची शेती करणाऱ्या 40 वर्षीय शेतकऱ्याचे नाव आहे. ते चोपडा तालुक्यातील वाळकी येथील रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या दीड एकर शेतात आणि भागवत पितांबर पाटील (Pitambar Patil) (रा. घोडगाव) यांच्याकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या दोन एकर शेतीत अफूची लागवड केली होती.
महामंडळाचे विलिनीकरण नाहीच; एसटी कर्मचार्यांना मोठा धक्का : ‘या’ तीन प्रमुख मुद्द्यांची ढाल
दरम्यान त्यांनी आपल्या शेतात अफूची लागवड केल्याची गुप्त माहिती चोपडा ग्रामीण पोलिसांना (Chopda Gramin Police) मिळाली. त्यानुसार पोलिसांनी आरोपी पाटील यांच्या शेतात छापेमारी केली. यावेळी तब्बल साडेतीन एकरावर फुललेली अफूची शेती पाहून पोलीसही भारावून गेले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी शेतकरी प्रकाश पाटील (Praksh Patil) यांना ताब्यात घेतले आहे.
तसेच 40 पोलीस शिपाई, 15 होमगार्ड आणि 10 स्थानिक मजुरांच्या मदतीने अफूची झाडे जप्त करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत एकूण एक हजार गोण्या अफू जप्त करण्यात आला आहे. दोन दिवसानंतरही हे काम सुरू असून आणखी 500 गोणी अफू उपटण्याचा बाकी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
OBC Reservation : ओबीसी आरक्षणावर विधासभेत बिल आणणार; अजित पवारांची घोषणा
या प्रकरणी पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता, जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आपण अफूची शेती केल्याचं आरोपी पाटील यांनी सांगितले आहे. पण ही शेती करण्यासाठी बियाणे कुठून आणले. तसेच या अफूची विक्री कोणाला केली जाणार होती. यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे? असे अनेक प्रश्न तूर्तास अनुत्तरित आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे. पोलीस चौकशीत लवकरच मोठा खुलासा होण्याची शक्यता असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास चोपडा पोलीस (Chopda Police) करत आहे.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Today’s Horoscope : जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशी मंथन, शनिवार, 20 ऑगस्ट 2022
20 तासांपासून हवेत लटकताहेत 48 जण; ड्रोननं अन्नपाण्याचा पुरवठा, बचावकार्य सुरु
वा रे वा नाशिक पोलिस! थेट पोलिस चौकीतच रंगली 'ओली पार्टी'; Video काढणाऱ्यांना चो...
Today's Horoscope : जाणून घ्या आजचे तुमचे राशी मंथन अन् पंचांग