‘दोघांना’ हेल्मेट सक्ती करणारे नाशिकचे पोलिस आयुक्तांनी मागितली बदली

नाशिकचे वादग्रस्त पोलिस आयुक्त दीपक पांडेंची अखेर उचलबांगडी; जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती l Nashik Police Commissioner Deepak Pandey finally transferred
नाशिकचे वादग्रस्त पोलिस आयुक्त दीपक पांडेंची अखेर उचलबांगडी; जयंत नाईकनवरे यांची नियुक्ती l Nashik Police Commissioner Deepak Pandey finally transferred
Share on Social Sites

नाशिक l Nashik (इ खबरबात नेटवर्क) :

हेल्मेट सक्ती, गुढीपाडव्यानिमित्त (Gudipadva) काढण्यात येणार्‍या शोभा यात्रांना बंदी आदी विविध मुद्यांवरून चर्चेत आलेले पोलिस आयुक्त दिपक पांडेय (Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांनी बदलीसाठी अर्ज केला आहे. कोणताही दबाव नसल्याचे ते सांगत असले तरी अचानक त्यांनी हा निर्णय घेतल्याने राजकीय दबावाची जोरदार चर्चा आहे.

आयुक्त पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर पांडेय यांनी धडाकेबाज निर्णय घेतले. नो हेल्मेट नो पेट्रोल (No Helmet No Petrol) या निर्णयामुळे हेल्मेट वापरणार्‍या वाहनाधारकांचे प्रमाणही वाढले होते. मध्यंतरी थंडावलेली ही कारवाई पुन्हा हाती घेतली जाणार असून पेट्रोलपंप चालकांना तशी सूचनाही करण्यात आली.

नाशिककरांनो! उद्याच करा वाहनाच्या टाक्या फुल्‍ल, अन्यथा…

तत्राप या निर्णयास पेट्रोलपंप चालकांनी विरोध दर्शवून गुढीपाडव्याला पेट्रोलपंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांचा एकेरी भाषेत उल्लेख करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या अटकेसाठी रत्नागिरीत पोलिस पथक पाठविण्याचे धाडस याच पांडे यांनी दाखविले होते.

https://ekhabarbat.com/demand-of-headmasters-group-to-education-authorities-for-early-training-nashik/

See also  MPSC Recruitment 2022 : ‘एमपीएससी’ची मेगा भरती; 'पीएसआय'च्या तब्बल 603 जागा

कोरोनाचे निर्बंध असल्याने गुढीपाडव्याला काढण्यात येणार्‍या शोभा यात्रांना परवानगी नाकारून त्यांनी नाराजीही ओढवून घेतली. बदली झाली तरी बेहत्तर पण, निर्णय मागे घेणार नाही, अशी भुमिका त्यांनी घेतली होती. एकाच वेळी सगळ्यांना अंगावर घेणार्‍या पांडेय यांनी या तापलेल्या वातावरणातच बदलीसाठी राज्याच्या गृह विभागाकडे अर्ज केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

नवाब मलिकांच्या मालमत्तेसंदर्भात नाशकात ईडीची धाड

राजकीय वा अन्य कोणाचाही दबाव नसल्याने त्यांचे म्हणणे असून वैयक्तिक कारणासाठी बदली मागितली आहे. तत्राप, शोभायात्रांना नाकारलेली परवानगी, हेल्मेट सक्तिवरून पेट्रोलपंप चालकांनी पुकारलेला संप आदी काही मुद्यांवरून संबंधितांशी मतभेद समोर आल्यानेच पांडेय यांच्यावर बदलीसाठी दबाव असल्याने बोलले जाते.

इंधन दरवाढीची झळ बांधावर, शेतकऱ्यांना फटका : मशागतीचा खर्च वाढला

पालकमंत्री भुजबळ हसले पण…

विनाहेल्मेट पेट्रोल दिल्यास पेट्रोलपंप चालकाविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा पांडे यांनी दिल्याने पेट्रोलपंप चालकांनी भुजबळ यांची भेट घेऊन सांगितले होते. निवेदनही दिले होते. त्यावर पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी हसून कपाळावर हात मारून घेतला होता. पण, पांडेय यांचा निर्णय त्यांना रूचलेला नव्हता. त्यातच पांडेय यांनी बदलीसाठी अर्ज दिल्याने या घटनेचा त्यांच्या बदलीशी काही संबंध आहे का, याबद्दलही चर्चा सुरू आहे.

JOB ALERT : नाशकातील ‘या’ मोठ्या कंपनीत 500हून अधिक जागांसाठी थेट मुलाखती द्वारे भरती

See also  Maharashtra Rain Update : सावधान! पुढील 'इतके' दिवस अतिमुसळधार पावसाचे, हवामान खात्याने दिला इशारा

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  फिरकीचा जादूगार काळाच्या पडद्याआड; शेन वॉर्नचे निधन

Share on Social Sites