मुंबई l Mumbai :
नोकरीच्या शोधात असलेल्या आणि पोलीस दलात भरती (Maharashtra Police Recruitment 2022) होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.
कारण, राज्यात मोठी पोलीस भरती होणार आहे. राज्यात तब्बल 7 हजारांहून अधिक पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक (Maharashtra State Cabinet meeting) आज पार पडली. या बैठकीनंतर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Home Minister Dilip Walse Patil) यांनी पोलीस भरतीच्या संदर्भात माहिती दिली आहे.
महाराष्ट्र शासनाने सन २०२० ची पोलिस शिपाई संवर्गातील ७,२३१ रिक्त पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. तसेच शासनाने पोलिस शिपाई सेवाप्रवेश नियमामध्ये सुधारणा केली असून पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा शारीरिक चाचणी होणार आहे. मैदानी चाचणीतील उत्तीर्ण उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
— HMO Maharashtra (@maharashtra_hmo) June 28, 2022
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, काही महिन्यांपूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाने दोन टप्प्यात पोलीस भरती करण्याचं ठरवलं होतं. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 5 हजार पोलीसांची भरती झालेली आहे. दुसऱ्या टप्प्यातील सात हजार 231 पोलिसांची भरती करण्याच्या संदर्भात नियमात दुरुस्ती करणं आवश्यक होतं. त्या दुरुस्तीनंतर आज गृहविभागाने निर्णय घेतला आहे की, आता उरलेली पोलीस भरती त्वरित सुरू करावी. त्या संदर्भात राज्याच्या पोलीस महासंचालकांना आदेश देण्यात आले आहेत. लवकरच ही पोलीस भरती सुरू होईल.
आज (दि. 28) कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. केवळ जे अजेंड्यावर विषय होते त्यावरच चर्चा झाली. कदाचित उद्याही कॅबिनेटची बैठक होऊ शकते. प्रलंबित काही विषय आहेत त्या संदर्भात उद्याच्या कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ शकते असंही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे अन् भाजपचं सरकार बनतंय पण… ‘या’ दोन खात्यांवर फिस्कटतंय?