
इगतपुरी l Igatpuri :
इगतपुरीत पूर्ववैमनस्यातून दोन गटात तुफान हाणामारी झाली आहे. या वादातून एकाचा खून झाला (Murder In Igatpuri) असून एक गंभीर जखमी झाला आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. पोलिसांनी शहरात संचारबंदी लागू केली असून मुख्य बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. (Igatpuri Gangwar News)
खून झालेला राहुल साळवे (Rahul Salave, Igatpuri) हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर रेल्वे (Railway) व शहर पोलिसांत (City Police) विविध गुन्हे दाखल आहे. याच घटनेत मॅकवेल (Macwell) ऊर्फ काऊ (Cow) हा गंभीर जखमी झाला. हल्ला करणारे २० ते २५ संशयित फरार झाले असून पोलिस त्यांचा शाेध घेत आहे. (Igatpuri Gangwar)
इगतपुरीतील गायकवाड नगर (Gaikwad Nagar, Igatpuri) परिसरात काल (दि. २८ जानेवारी) दुपारी २ वाजता डेव्हिड गँग (David Gang Igautpuri) व नांदगाव सदो (Nandgaon Sado) येथील तरुणांमध्ये काल (शुक्रवारी) सकाळी वाद उफाळून आला हाेता. संबंधिताना पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. (Igatpuri Gang War)
दरम्यान, दुपारी पुन्हा हाणामारी झाली. यात दगडफेक करत तलवारी (Swords), कोयते (Axes), चाॅपरचा (Chopper) धाक दाखविण्यात येत हाेता. या घटनेत तीन गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यासह ५ दुचाकींसह काळू सदगिर (Kalu Sadgir) यांच्या घरांचे माेठे नुकसान करण्यात आले. यात दरवाजे, खिडक्या, पत्र्यावर दगडफेक व तलवारीचे वार करण्यात आले. (Igatpuri murder case)
पोलिसांनी घटनास्थळावरून चाकू (Knife), लाकडी दांडे (Wooden Stick), ९ दुचाकी जप्त केल्या. घटनेत गंभीर जखमी झालेल्यांना इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात (Igatpuri Rural Hospital) दाखल केले. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात (District Hospital) हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधीक्षक डॉ. सचिन पाटील (Superintendent of Police Dr. Sachin Patil) यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे (Additional Superintendent of Police Madhuri Kangane), उपअधीक्षक अर्जुन भोसले (Deputy Superintendent of Police Arjun Bhosal) यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाने भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली. (Gangwar in Igatpuri)
इगतपुरी (Igatpuri) शहराजवळील नांदगाव सदो (Nandgaon Sado) या गावात काही दिवसापूर्वी पूर्ववैमनस्यातून दाेन गटात भांडणे झाली हाेती. त्या वादातूनच ही मारहाणीची घटना घडली. इगतपुरी शहरात पाेलिसांचा माेठा बंदाेबक्त ठेवण्यात आला असून सध्या शांतता आहे. नागरिकांनी अफवांना बळी न पडता घाबरून जाऊ नये. पोलिसांकडून याबाबत कसून तपास सुरू आहे. नागरिकांकडे सीसीटीव्ही फुटेज (CCTV footage) अथवा अन्य प्रकारची माहिती असेल तर पोलिसांना याबाबत सविस्तर माहिती द्यावी. जेणेकरून याेग्य वक्तींवर कारवाई करणे शक्य हाेणार आहे. माहिती देणाऱ्या संबंधितांचे नाव गुप्त ठेवले जाईल.
: सचिन पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक (Sachin Patil, Superintendent of Police, Nashik)
खळबळजनक! व्हिडीओ शूट करत ३ जवानांचा महिलेवर सामूहिक बलात्कार