मुंबई l Mumbai :
अभिनेता यशची (Actor Yash) मुख्य भूमिका असलेल्या ‘केजीएफ : चाप्टर 2’ (KGF : Chapter 2) या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई सुरू आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या वीकेंडला या ब्लॉकबस्टर चित्रपटाने तब्बल 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. (KGF Chapter 2 Box Office Collection News)
चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शने दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या वीकेंडला या चित्रपटाने 50 कोटींचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे आतापर्यंत या चित्रपटाची कमाई 321.12 कोटी रुपये इतकी झाली आहे. प्रशांत नील दिग्दर्शित (Director by Prashant Neel) या चित्रपटात कन्नड सुपरस्टार यश (Kannada superstar Yash) सोबत संजय दत्त (Sanjay Dutt) आणि रवीना टंडन (Raveena Tandon) या बॉलिवूड (Bollywood) कलाकारांच्याही भूमिका आहे.
https://twitter.com/Sp23096340Cyber/status/1518542069261758464
2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ: चाप्टर 1’ (KGF : Chapter 1) या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. कन्नड (Kannada), तमिळ (Tamil), तेलुगू (Telugu) आणि हिंदी (Hindi) अशा विविध भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला असून हिंदी व्हर्जननेच 300 कोटींचा टप्पा पार केला आहे. (KGF Box Office Collection)
#KGFChapter2 will enter 900 cr worldwide gross with today's collection. Its a certain movie gonna surpass the prestigious Thousand crore club in upcoming days.#KGF2 #Yash #PrashanthNeel
— Aditya Siddhartha Roy❁ (@Adityaroypspk) April 25, 2022
‘केजीएफ : चाप्टर 2 च्या दुसऱ्या वीकेंडची कमाई :
शुक्रवार- 11.56 कोटी रुपये
शनिवार- 18.25 कोटी रुपये
रविवार- 22.68 कोटी रुपये
केजीएफ 2 हा सर्वाधिक कमाई करणारा सहावा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसवर इतरही चित्रपटांना फटका बसला आहे. शाहिद कपूरच्या ‘जर्सी’ (Shahid Kapoor’s ‘Jersey’) या चित्रपटाला प्रेक्षक-समीक्षकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. मात्र केजीएफ 2 मुळे त्याच्या कमाईवर परिणाम झाला आहे.
तरण आदर्शचं ट्विट- (Taran Adarsh’s tweet)
#RockyBhai is #RocKING on [second] Sun… #KGF2 hits it out of the stadium yet again… *Weekend 2* crosses ₹ 50 cr mark, FANTASTIC… NOW, 6TH HIGHEST GROSSING *HINDI* FILM… [Week 2] Fri 11.56 cr, Sat 18.25 cr, Sun 22.68 cr. Total: ₹ 321.12 cr. #India biz. #Hindi pic.twitter.com/QNgGIGwrgP
— taran adarsh (@taran_adarsh) April 25, 2022
बॉक्स ऑफिस इंडियाने (Box Office India) दिलेल्या माहितीनुसार, केजीएफ 2 ने जगभरात आतापर्यंत 818.73 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रजनीकांत (Rajinikanth) आणि अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘2.0’ या चित्रपटाला केजीएफ 2 ने मागे टाकले आहे. येत्या काही दिवसांत तो ‘पीके’ (PK) या चित्रपटालाही मागे टाकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजकुमार हिरानी (Rajkumar Hirani) दिग्दर्शित ‘पीके’ या चित्रपटाने जगभरात 854 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता.
मोठी कारवाई! 9 जणांसह पाकिस्तानी बोट पकडली, तब्बल 280 कोटींचे ‘हेरॉईन’ जप्त