‘अभिनव भारत’ निधी श्रेयासाठी खा. हेमंत गोडसे यांचा केविलवाणा प्रयत्न; आ. फरांदे यांचा थेट आरोप

'अभिनव भारत' निधी श्रेयासाठी खा. हेमंत गोडसे यांचा केविलवाणा प्रयत्न; आ. फरांदे यांचा थेट आरोप l Shivsena MP Hemant Godse taking credit of Abhinav Bharat Mandir BJP MLA Devyani Farande raised issue in Assembly
'अभिनव भारत' निधी श्रेयासाठी खा. हेमंत गोडसे यांचा केविलवाणा प्रयत्न; आ. फरांदे यांचा थेट आरोप l Shivsena MP Hemant Godse taking credit of Abhinav Bharat Mandir BJP MLA Devyani Farande raised issue in Assembly
Share on Social Sites

नाशिक । Nashik :

शहरातील सुप्रसिद्ध अभिनव भारत मंदिराच्या (Abhinav Bharat Mandir, Nashik) नूतनीकरणासाठी आपण सलग चार वर्षे प्रयत्न केले असताना खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse) त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब आ. देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) यांनी विधानसभेत (Legislative Assembly) स्पष्ट केली.

राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (state tourism minister Aditya Thackeray) यांच्यासमोर कागदपत्रे वाचून दाखवत आ. फरांदे यांनी खा. गोडसे यांच्या या केविलवाण्या प्रयत्नांबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. खा. गोडसे यांनी अभिनव भारत मंदिराला कधीही साधी भेट सुद्धा दिली नाही.

‘तो’ नदीत उडी मारणार तेच तरुणाने धाव घेऊन हात पकडला, पाहा नाशिकचा थरारक VIDEO

आता निधी मिळणार म्हटल्यानंतर श्रेयवाद आणि प्रसिद्धीसाठी आपल्या नावाचे घोडे दामटत आहेत, हे पाहून आ. फरांदे विधानसभेत आक्रमक झाल्या. त्यांनी थेट आदित्य ठाकरेंसमोरच हे सारे प्रकरण मांडले.

दोन दिवसांपूर्वी अभिनव भारत मंदिराला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी निधी दिला. त्यासाठी खा. गोडसे यांनी प्रयत्न केला, अशा बातम्या प्रसृत झाल्याने होत्या. दरम्यान, हा निधी आ. फरांदे यांनाच दिला जाणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

आजपासून १२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण; जाणून घ्या कोठे मिळणार डोस

फडणवीस सरकारकडून 1 कोटी (1 crore from Fadnavis government)

नाशिक (Nashik) येथील अभिनव भारत मंदिराचे नूतनीकरण करावे याची मागणी 1968 झाली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Freedom fighter Vinayak Damodar Savarkar) यांनी केली होती. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हा विषय आ. फरांदे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला. या प्रकल्पासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या काळात 1 कोटी रुपयांचा निधी दिला गेला. त्याचा कार्यारंभ आदेश देऊन काम प्रगतिपथावर आहे.

पोलीस चौकीतील ओली पार्टी भोवली; ‘ते’ चार मद्यपी पोलीस थेट निलंबित

देवयानी फरांदेंचे अतिरिक्त 5 कोटीसाठी प्रयत्न

अभिनव भारत मंदिरला अतिरिक्त 5 कोटी रुपयांचा निधी मिळावा म्हणून आ. फरांदे यांनी मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (Public Works Department (PWD) याबाबतचा प्रस्ताव 18 मे 2018 रोजी आ. फरांदे यांच्या मागणीनुसार देण्यात आला होता. त्या प्रस्तावाच्या अनुषंगाने सदर कामाला 5 कोटी रुपयांचा निधी मिळावेत यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अधिवेशनात देखील फरांदे यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन निधीची मागणी केली. त्यानंतर निधी मिळाल्याच्या बातम्या आल्या.

अल्पवयीन मुलीला गर्भवती करणाऱ्या ‘त्या’ आरोपीला जन्मठेप

खा. गोडसेंनी जनतेची कामे करावी
आ. फरांदे म्हणाल्या, खा. गोडसे यांनी आतापर्यंत कधी अभिनव भारत मंदिरला साधी भेटही दिली नाही. निधी मिळावा म्हणून कोणताही प्रयत्न आणि प्रक्रिया केली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातून नव्याने प्रस्ताव देखील दिला नाही. मात्र, कोणतेही काम न करता अभिनव भारतासाठी आपण निधी मिळवल्याच्या बातम्या पेरल्या. हे वृत्त खोडसाळपणाचे आणि श्रेय लाटण्याचा दुर्दैवी प्रयत्न आहे. खा. गोडसे यांनी श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न न करता जनतेची कामे करावी, असा सल्ला आ. फरांदे यांनी दिला.

शुल्लक कारणावरून मुख्याध्यापकाची विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण; नाशकातील स्कॉटीश अकॅडमी शाळेतील प्रकार

See also  Rule Changes from 1st June : 1 जूनपासून बँकिंग, विमा आणि गृहकर्जासह अनेक क्षेत्रात होणार 'हे' 5 मोठे बदल

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  राज्यात चाललंय तरी काय?... धुळ्यानंतर आता 'या' ठिकाणी मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा जप्त; महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे कारस्थान?

Share on Social Sites