
नांदेड l Nanded :
दोन दिवसांपूर्वीच धुळ्यात मोठ्या प्रमाणात तलवारींचा साठा जप्त (89 Sword seized in Dhule) केल्याने एकच खळबळ उडाली होती. यावरुन भाजपाने (BJP Maharashtra) अनेक गंभीर प्रश्नही उपस्थित केले आहेत. त्याच दरम्यान आता नांदेड (Nanded) मध्ये तलवारींचा मोठा साठा जप्त (25 sword seized in Nanded) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Nanded Crime News)
नांदेडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने (Shivajinagar Police Station, Crime Branch, Nanded) रिक्षातून नेण्यात येणारा तलवारींचा साठा जप्त केला आहे. त्यासोबतच एका आरोपीला अटक सुद्धा करण्यात आली आहे. (Stock of swords seized from Autorikshaw in Nanded, One accused arrested)
Maharashtra | 25 swords found in an Auto by police in Nanded
Swords were transported in an Auto. Police laid the trap & it was intercepted. Seems like they were ordered from Amritsar. A boy & owner of gift shop arrested. Investigation is underway: Pramodkumar Shewale, SP, Nanded pic.twitter.com/Sbm6nNbpsr
— ANI (@ANI) April 29, 2022
नांदेड शहरातील गोकुळनगर (Gokulnagar) भागातुन ऑटोतुन शस्त्रसाठा नेला जात असल्याची गुप्त माहिती पोलीसांना मिळाली. त्यानंतर तातडीने पोलीसांनी ऑटोची तपासणी केली. त्यावेळी तब्बल 25 तलवारी आढळून आल्या. या प्रकरणी आकाश गोटकवाड (Aakash Gotakvad) याला पोलिसांनी अटक केली आहे. विक्रीच्या उद्देशाने तलवारी आणल्याची कबूली त्याने दिली आहे.
अमृतसर पंजाबहून (Amritsar, Punjab) रेल्वेत पार्सल करून तलवारी नांदेडला आणल्याचे आरोपी आकाश याने सांगितले आहे. यात आणखी कोण सहभागी आहेत का याचा तपास सुरू आहे. पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट?, धुळ्यात चौघांकडून तब्बल 89 तलवारी, 1 खंजीर जप्त
राम कदमांचा आरोप (BJP Ram Kadam)
तलवारींचा साठा जप्त करण्यात आल्यावर भाजपा आमदार राम कदम (BJP MLA Ram Kadam) यांनी काँग्रेसवर (Congress) गंभीर आरोप केला आहे. “महाराष्ट्रात दंगली घडविण्याचे कारस्थान? जेथे कॉंग्रेसचे सरकार आहे त्या राजस्थानमधून (Rajastan) जालना (Jalana) जाणार्या 90 तलवारी ताब्यात. याआधीच पुणे (Pune) येथे तलवारी औरंगाबाद (Aurangabad) येथे जात असताना ताब्यात घेण्यात आल्या आहेत. कॉंग्रेस या षड्यंत्रात सामील आहे का? ठाकरे सरकार याच्या मुळाशी”, असा खळबळजनक आरोप राम कदम यांनी केला आहे.
राज्यात निवडणुकांचा बिगुल पावसाळ्यानंतर?; मविआला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता
राज ठाकरेंच्या अल्टिमेटम नंतर पोलीस प्रशासन ‘हाय अलर्ट’वर (Police administration on high alert after Raj Thackeray’s ultimatum)
राज ठाकरे यांनी मशिंदींवरील भोंग्यांच्या (Mosque Speaker Ban) संदर्भात दिलेल्या अल्टिमेटमनंतर महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील (Maharashtra Home Minister Dilip Walse-Patil) यांनी गोपनीय अहवालाचा उल्लेख करत महाराष्ट्रात दि. 03 मे नंतर विस्फोटक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. या सर्व घडामोडी पाहता सुरक्षेच्या दृष्टीने सर्व गोष्टींची काळजी घेतली जात आहे.
https://twitter.com/NewsArenaIndia/status/1519981307253600256
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
‘आयटम चाहीये, तुझे? हांss..’ म्हणत फोनवरुन सेक्सची मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या वि...
CBSE 10th Exam Results: दहावीचा निकाल जाहीर, कधी आणि कसे मिळेल मार्कशीट?
'गेम'चा नाद लई बेक्कार! बापाच्या मृत्यु पश्चात माय माऊलीने 36 लाख जमवले पण मुलान...
Online Loan Apps : 'लोन अॅप्स'मुळे अनेकजण कर्जाच्या जाळ्यात! मदतीसाठी 'गूगल'ने ...