नाशिक । Nashik :
शाळेतील काच फुटल्याच्या किरकोळ कारणावरून दहावीच्या सहा ते सात विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी बेदम मारहाण करण्याचा संतापजनक प्रकार शहरातील जेलरोड (Jailroad) परिसरातील स्कॉटीश अकॅडमी (Scottish Academy school) शाळेत घडल्याचे समोर आले आहे.
विद्यार्थ्यांपैकी यशराज ढिकले (Yashraj Dhikale) याने आपल्याला झालेल्या अमानुष मारहाणीची आपबीती माध्यमांना सांगितली. त्याच्या अक्षरश: पाठीवर, दंडावर उमटलेले वळही त्यांने दाखवल्याने पालकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
नाशिकचा गड जिंकण्यासाठी पुन्हा ‘संकटमोचक ‘… रावल यांची गच्छंती
प्रकरण नेमके काय ?
नाशिकमधील जेलरोड भागात स्कॉटीश अकॅडमी शाळा आहे. (Scottish Academy school, Jail Road, Nashik) या शाळेचा परिसरात मोठा नावलौकीक आहे. साधी काच फुटली म्हणून मुख्याध्यापकाने दहावीच्या विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचे समोर आले आहे. सहा ते सात विद्यार्थ्यांना मारहाणीमुळे दंडावर आणि छातीवर वळ उठले. पैकी यशराज ढिकले या विद्यार्थ्याची पाठ मारहाणीमुळे सोलून निघाली आहे.
20 वर्षांनी लहान बॉयफ्रेंडसाठी 4 लेकरांच्या आईनं केली हद्द पार; नाशकात लव्हस्टोरीचा असा झाला शेवट
पोलीसांत न जाण्याबद्दल धमकी
इतक्या बेदम मारहाणीनंतर मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांकडे चक्क पाच हजार रुपयांची मागणीही केली हे. या प्रकरणी कुठे तक्रार कराल, पोलिसात जाल, तर तुमचे दहावीचे वर्ष बरबाद करू, अशी धमकीही मुख्याध्यापकाने विद्यार्थ्यांना दिली. यातल्या एका विद्यार्थ्याने पोलिसात धाव घेतली. मात्र, दुसर्या विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलाचे वर्ष वाया जाईल म्हणून तक्रार देण्यासाठी घाबरत आहेत. या मुख्याध्यापकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी संतप्त पालकांकडून होत आहे.
Russia-Ukraine War : धक्कादायक! युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण