धुळे l Dhule :
धुळे जिल्ह्यातील (Dhule District) ११ स्वस्त धान्य दुकानांचे परवाने एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे. या दुकान चालकांकडून खुलासे मागवण्यात आले असून यानंतर अंतिम कारवाईचा निर्णय घेण्यात येणार आहे. (Licenses of 11 ration shops in Dhule district have been suspendedt)
स्वस्त धान्य दुकानाचा परवाना घेतला. तथापि लाभार्थींना कोणतीही सेवा दिली नाही. कोणत्या ना कोणत्या कारणाने वर्षानुवर्ष दुकाने अकार्यान्वित ठेवली. कोरोना कालावधीमध्ये (Corona Pandamic) ग्राहकांना सेवा दिली नाही.
बेक्कार थंडी शे रे भो!; खान्देशात हुडहुडी कायम : धुळ्यात नीचांकी तपमान @२.८
वैद्यकीय रजेचे कारण पुढे केले, म्हणून जिल्ह्यातील सुमारे अकरा स्वस्त धान्य दुकाने जिल्हा पुरवठा अधिकारी (District Supply Officer) यांनी निलंबित केले आहे. त्यांना नोटिसा देण्यात आल्या असून त्यांचा खुलासा प्राप्त होताच पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.
निलंबित करण्यात आलेल्या स्वस्त धान्य दुकानामध्ये शिरपूर तालुक्यातील चीलारे (Chilare, Shirpur) येथील रवींद्र सजन पावरा दुकान क्र. १२६ , बलकुवे (Balkuve) येथील योगेश माधवराव पाटील दुकान क्र. ६३ , उंटावद (Untavad) येथील श्री शनी मंदिर ट्रस्ट दुकान क्र. १८४.
खरदे बुद्रुक (Kharde Budruk) येथील नरेंद्र नारायण सोनवणे दुकान क्र. १९३, वाकपाडा (Vakpada) येथील राकेश दुलबा पावरा दुकान क्र. १३६, साकवाद (Sakvad) येथील राजेन्द्र नथू पाटील दुकान क्र. १५३.
थाळनेर (Thalner) येथील पी झेड ठाकूर दुकान क्र. १०५ आणि शिंदखेडा तालुक्यातील विखुरले (Vikhurle, Shindkheda) येथील भीमगर्जना महिला बचत गट दुकान क्र. १०५.
चादगड (Chadgad) येथील सोनाऱ्या रानमळा महिला बचत गट दुकान क्र. १५०, वायपूर (Vaypur) येथील रमेश महादेव भावसार दुकान क्र. ७२, शिराळे (Shirale) येथील मातोश्री महिला बचत गट, दुकान क्र. १८० हे सर्व दुकानदार तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीकरिता वैद्यकीय रजेवर असल्यामुळे सदर दुकानांचे प्राधिकार पत्र पुढील एक महिन्यासाठी निलंबित करण्यात आले आहे.
Dhule : ‘त्या’ खून प्रकरणात बापासह दोन मुलांना जन्मठेपेची शिक्षा; शिंदखेडा तालुक्यातील घटना
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
अखेर राज ठाकरेंवर 'या' कलमान्वये गुन्हा दाखल; गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर अटक होण...
खळबळजनक! विद्यार्थी पुन्हा कोरोना व्हायरसच्या विळख्यात; शाळेतील तब्बल 64 जण 'पॉझ...
Dearness Allowance Hike : आनंदवार्ता आलीच; केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई ...
चिथावणीखोर ‘सातवी पास भाऊ'ची न्यायालयात माफी; 'या' तारखे पर्यंत पोलीस कोठडी