धुळ्यातील 'त्या' १००३ तर पुण्यातील ३२३ उत्तीर्ण उमेदवारांवर कारवाईची टांगती तलवार; पोलिसांच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर l TET Exam Scam update
Share on Social Sites
पुणे l Pune :
पुणे सायबर पोलिसांकडून (Pune Cyber Police) सुरु असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test TET Exam Scam) घोटाळ्याच्या तपासात खळबळजनक बाबी उघड होत आहे.
पुणे पोलिसांनी केलेल्या तपासात राज्यातील तब्बल ७८८० विद्यार्थी बनावट पद्धतीने उत्तीर्ण झाल्याचे समोर आले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा २०१९ मध्ये हा गैरप्रकार झाला होता. ही परीक्षा २०२० मध्ये झाली होती.
७८८० जणांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे. टीईटी परीक्षेत लाखो रुपये देऊन पात्र झालेल्या ७ हजार ८८० जणांपैकी तब्बल १००३ अपात्र उमेदवार फक्त धुळ्यातील (Dhule) आहेत.
तर, पुण्यात ३२३ अपात्र उमेदवार असल्याचं समोर आले आहे. अपात्र असतानाही पैसे देऊन पात्र झालेले उमेदवार राज्यातील विविध भागातील खासगी आणि सरकारी शाळांमध्ये नोकरीला असल्याची बाब समोर आली आहे.
२०१९ च्या परीक्षेत धुळ्यातील १००३ जण पैसे देऊन उत्तीर्ण
टीईटी परीक्षेत लाखो रुपये देऊन पात्र झालेल्या ७ हजार ८८० जणांपैकी तब्बल १००३ अपात्र उमेदवार फक्त धुळ्यात तर पुण्यात ३२३ अपात्र उमेदवार असल्याची माहिती समोर आली आहे. अपात्र असतानाही पैसे देऊन पात्र झालेले उमेदवार राज्यातील विविध भागातील खासगी आणि सरकारी शाळांमध्ये नोकरीला असल्याचं समोर आलं आहे.
आरोपींवर लागणार लाचलुचपतचे कलम
TET परीक्षा घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे (Commissioner of Maharashtra State Examination Council Tukaram Supe), माजी आयुक्त सुखदेव डेरे (former Commissioner Sukhdev Dere), शिक्षण विभागाचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर (Technical Adviser to the Education Department Abhishek Savarikar), जीए टेक्नॉलॉजीचा आश्विन कुमार (Ashwin Kumar of GA Technology), सौरभ त्रिपाठी, डॉ. प्रीतिश देशमुख आणि आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर (IAS officer Sushil Khodvekar) याच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे. म्हाडा (MHADA), आरोग्य (Health) आणि टीईटी प्रकरणातील आरोपींच्या मालमत्तेची चौकशी होणार आहे. पेपरफुटीप्रकरणी लाचलुचपतची कलमे लावण्यात येणार आहेत.
जी. ए. टेक्नॉलॉजीचे गणेशन यांची चौकशी सुरु (G. A. Ganesan’s inquiry into technology begins)
जी.ए. टेक्नॉलाजीचे गणेशन हा ट्रान्झिट रिमांड घेऊन पुणे पोलिसांसमोर टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी हजर झाला आहे. पुणे पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, पुणे पोलिसांकडून सुरु असलेल्या टीईटी गैरप्रकारातील घोटाळ्याची व्याप्ती वाढणार असल्याचे समोर येत आहे.