नाशिक l Nashik :
जिल्ह्यात विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. (Students Group Free Style Fighting in Nashik) नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच हा प्रकार घडला आहे.
व्हॅलेंटाईन्स डे (Valentine’s Days) च्या निमित्ताने विविध तरुणांमध्ये ‘डेज्’ सेलिब्रेट केले जात आहे. अशात प्रपोज डे (Propose Day) साजरा होत असतानाच ही मारामारी झाली. विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये कुठल्याशा कारणावरुन वाद झाला होता.
दे दणा दण! हायप्रोफाईल शाळेच्या विद्यार्थिनींमध्ये ‘फ्री’ स्टाईल राडा, पाहा व्हिडीओ
या वादाचे पर्यवसन थेट फ्री स्टाईल फायटिंगमध्ये झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड (Niphad) गावातील कॉलेज कॅम्पसमध्ये दोन गटात ही तुफान हाणामारी झाली आहे. यामध्ये काही विद्यार्थ्यांना अक्षरशः तुडव-तुडव-तुडवल्याचे पाहायला मिळत आहे.
या घटनेचा व्हिडीओ काही जणांनी इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहे. हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल (Instagram Viral Video) झाला आहे. मात्र कॉलेजमध्येच युवकांची मारामारी झाल्यामुळे महाविद्यालयातील सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
#ViralVideo : दे दणा दण! प्रपोस डे ला वाद; नाशिकच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन ग्रुपमध्ये 'फ्री स्टाईल' : सविस्तर बातमी वाचण्यासाठी https://t.co/bCNvGElgA1 ला भेट द्या!#ValentinesDay #ProposeDay2022 #Nashik #Nasik #Niphad #Maharashtra #प्रपोस_डे #महाराष्ट्र #नाशिक #निफाड pic.twitter.com/H5qmb3gg4H
— इ खबरबात l eKhabarbat (@ekhabarbat) February 9, 2022
यामुळे झाली फ्री स्टाईल
काल दि. ०९ (मंगळवारी) झालेल्या प्रपोज डे (Propose Day) ला विद्यार्थ्यांच्या दोन गटात काही कारणावरुन वाद झाला. बघता बघता या वादाचे रुपांतर थेट तुफान हाणामारीमध्ये झाले. नाशिक जिल्ह्यातील निफाड गावातील महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्येच हा प्रकार घडला. अनेकदा कॉलेजमध्ये अशा छोट्या-मोठ्या मारामाऱ्या होतच असतात. नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या हाणामारीचे व्हिडीओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही शहरातील नामांकित महाविद्यालयात दोन युवतींमधील फ्री स्टाईल जोरदार चर्चेत होती.
विद्यार्थ्यांनी एकमेकांना तुडव-तुडव तुडवल
सुरुवातीला झालेल्या वादावादीनंतर दोन गटांमध्ये फ्री स्टाईल फायटिंग सुरु झालेली. त्यानंतर काही जणांनी एकमेकांना अक्षरशः तुडव-तुडव-तुडवल्याचे पाहायला मिळाले. कुठल्या मुलीला प्रपोज करण्यावरुन वाद झाला, की अन्य कुठल्या कारणावरुन, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तसेच कुठल्या विद्यार्थ्याला यात गंभीर दुखापत झाली आहे का, याबाबतही माहिती मिळालेली नाही. परंतु कॉलेजमध्येच विद्यार्थ्यांमध्ये इतकी मारामारी झाल्यामुळे महाविद्यालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
या घटनेचा व्हिडीओ काही जणांनी इन्स्टाग्राम अकाऊण्टवर शेअर केले आहेत. हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
नाशकातील सातपूरच्या कारखान्यात भीषण अग्नितांडव!; पहिला मजला जळून खाक
राज्यात शिवशक्ती-भीमशक्तीचा नवा प्रयोग! ठाकरे गट आंबेडकरांसोबत जाणार तर शिंदे गट...
'मनसे'ची माघार.. अक्षय्य तृतीयेचा महाआरती कार्यक्रम रद्द; सांगितलं 'हे' कारण
Russia Ukraine War : रशियन हल्ल्याचा दुसरा दिवस; युद्धात ८०० हून अधिक रशियन सैनि...