
धुळे l Dhule :
उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) अर्थात खान्देशात (खान्देश) पारा कमालीचा घसरल्यामुळे थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. काल (गुरुवारी) धुळ्याचा पारा नीचांकी २.८ अंशांवर घसरला. मागील दोन वर्षात २७ जानेवारी २०२२ हा सर्वांत थंड दिवस अशी नोंद झाली आहे.
यापूर्वी २९ जानेवारी २०१९ मध्ये २.७ एवढे नीचांकी तापमान होते. उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे धुळे शहरासह जिल्ह्यातील तपमानात दररोज घट होत आहे. नंदुरबारचे (Nandurbar) ८.० अंश तर तोरणमाळचे (Toranmal) ५ अंश तपमान नोंदले.
मराठवाडा (Marathwada), विदर्भात (Vidarbha) अद्याप थंडीचा कडाका जाणवत असून काल (गुरुवारी) औरंगाबाद जिल्ह्याचे (Aurangabad District) तपमान ८.८ नोंदवले गेले. तर खान्देशात धुळे जिल्ह्यात सर्वात कमी २.८ अंश सेल्सियसची नोंद झाली. विदर्भासह खान्देशात दोन दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे.
मालेगाव महापालिकेत काँग्रेसचा सुफडा साफ, आमदारासह २८ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश
उत्तरेकडील थंडगार वाऱ्यांमुळे दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यात (Nashik District) किमान तपमान हे ५ अंशापेक्षाही खाली गेल्याने निफाड तालुक्यात (Niphad Taluka) दवबिंदु गोठले होते. गुरुवारी मात्र मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यामध्ये किमान तापमानात वाढ होऊन थंडी काही प्रमाणात कमी झाली आहे.
गुरुवारपासुन किमान तपमानात काही अंशी वाढ झाली असल्याने थंडीपासून दिलासा मिळाला आहे. परंतु गार वारे वाहत असल्याने वातावरणात दिवसभर गारवा जाणवत होता.
विदर्भातील नागपूर (Nagpur), गोंदिया (Gondia), चंद्रपूर (Chandrapur), वर्धा (Wardha), अकोला (Akola), अमरावती (Amravati) हे जिल्हे गारठले होते, तर मराठवाड्यात औरंगाबाद (Aurangabad), परभणी (Parbhani), नांदेड (Nanded) या जिल्ह्यात किमान तपमानात घसरण झाली होती. तर जळगाव (Jalgaon), अहमदनगर (Ahmednagar), पुणे (Pune), नाशिक (Nashik), महाबळेश्वर (Mahabaleshwar) या शहरामध्येही थंडीचा कडाका जाणवला.
काही प्रमुख शहरांतील तापमान :
-
नागपूर (Nagpur) ८.३
-
जळगाव (Jalgaon) ८.५
-
गोंदिया (Gondia) ८.८
-
औरंगाबाद (Aurangabad) ८.८
-
अहमदनगर (Ahmednagar) ९.०
-
अकोला (Ahmednagar) ९.३
-
वर्धा (Wardha) ९.४
-
परभणी (Parbhani) १०.०
-
अमरावती (Amravati) १०.०
-
नाशिक (Nashik) १०.४
Nagarpanchayat Reservation : राज्यातील १३९ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर; सविस्तर वाचा