मुंबई l Mumbai :
शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत (Shiv Sena MP and Chief Spokesperson Sanjay Raut) यांनी काल (दि. १६) मंगळवारी शिवसेना भवनावर (Shivsena) घेतलेल्या पत्रकार परिषदेवरून राज्यातले राजकीय वातावरण चांगलेच तापले असतानाच त्यावर आता नारायण राणेंनी (Narayan Rane) गंभीर आरोप करत टीका केली आहे.
नारायण राणेंनी आज (दि. १६) संध्याकाळी मुंबईत भाजपा कार्यालयात (BJP Office) घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊतांच्या त्या पत्रकार परिषदेवर निशाणा साधतानाच संजय राऊतांनी भाजपावर केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
सौ बात की एक बात : आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?; वाचा सविस्तर
“राऊतांना घाम का फुटला होता?”
पत्रकार परिषदेत संजय राऊतांना घाम फुटला होता, असे राणे म्हणाले आहे. ती एक आंतरराष्ट्रीय पत्रकार परिषद होती असे म्हणत त्यांनी उपहासात्मक टीका देखील केली. “संजय राऊत यांची पत्रकार परिषदेला केविलवाणी परिस्थिती झाली होती. घाम फुटला होता. ते वारंवार सांगत होते की मी कुणाला घाबरत नाही. मर्दांची शिवसेना आहे. पण मर्द माणसाला मर्द आहे हे सांगायची गरज नसते. जो घाबरतो, तोच वारंवार सांगत असतो की मी कुणाला घाबरत नाही”, असे राणे म्हणाले.
“पत्रकार परिषदेची जाहिरात सांगत होती की राज्यभरातले नेते, मंत्री येणार. पण साधे विभाग प्रमुखही आले नव्हते. शिवाजी पार्कचे विभाग प्रमुख नव्हते. नाशिकचे मात्र काही मोजके नेते होते. कारण संपर्क प्रमुख आहे ते”, असं राणे म्हणाले.
“संजय राऊत २ जून १९९२ ला शिवसेनेत आले. सामनामध्ये संपादक (Samana News Paper) म्हणून आले. मार्मिकमधून हकालपट्टी झाली मग लोकप्रभाला गेले. लोकप्रभात असताना त्यांनी पराक्रम केले. त्यांनी तेव्हा बाळासाहेब ठाकरेंविरुद्ध (Balasaheb Thackeray) अनेक लेख लिहिले. साहेबांनी हा कसा पत्रकार आहे याविषयी बोलले होते. संजय राऊत अंतर्गत आग कशी लावता येईल हे पाहात असतो, असे बाळासाहेब म्हणाले होते”, असे देखील राणे म्हणाले. शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली की स्वत: अडचणीत आहेत म्हणून घेतली? जणू शिवसेना प्रमुख हेच झालेत अशा आवेशात पत्रकार परिषद घेतली, असं राणे म्हणाले.
LIVE : संजय राऊतांच्या स्फोटक आरोपानंतर आता नारायण राणे रींगणात; पाहा लाईव्ह व्हिडीओ