
नाशिक l Nashik :
संगणकात फेरफार करून एका नोकराने मालकाला तब्बल ४० लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना नाशिकरोडच्या (Nashik Road) परिसरातील सिन्नर फाटा (Sinnar Phata) येथे उघडकीस आली आहे.
मद्य विक्री करणार्या आस्थापनेत हा प्रकार उघडकीस आला आहे. हडप केलेल्या पैशातून गृहकर्जाचे हप्ते (Home Loan Installment) मुदतपूर्व भरल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार, सिन्नर फाटा परिसरातील हिरा वाईन (Hira Wine) ही मद्य विक्री करणारी फर्म आहे. या ठिकाणी सेवेत असलेले अविनाश अनिल खैरनार (वय २४, रा. म्हसरूळ), मुसा अब्दुल शेख (वय ३५, रा. एकलहरा रोड, सिन्नर फाटा) यांनी जुलै २०१८ ते नोव्हेंबर २०२० या काळात संगनमताने विक्री केलेल्या मालाबाबत संगणकाच्या नोंदणीमध्ये फेरफार करून ४० लाख, आठ हजार ४८३ रुपयांचा अपहार केला.
त्यातून मिळालेल्या रकमेचा वापर करत अविनाश खैरनार याने आई अनिता अनिल खैरनार यांच्या नावावरील गृहकर्जाचे हप्ते मुदतपूर्व भरणा केल्याचे उघड झाले आहे.
Nashik Crime : प्रियकराने तिचं लग्न मोडलं, ‘ती’ ने थेट त्याला जिवंत जाळलं