“नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले…” : अमृता फडणवीसांनी शेअर केला ‘१०० मार्कांचा पेपर’; म्हणाल्या…

“नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले…” : अमृता फडणवीसांनी शेअर केला '१०० मार्कांचा पेपर’; म्हणाल्या... l Amruta Fadnavis Tweet Slamming MahaVikas Aghadi Maharashtra
“नॉटी नामर्द, बिगडे नवाब, नन्हे पटोले…” : अमृता फडणवीसांनी शेअर केला '१०० मार्कांचा पेपर’; म्हणाल्या... l Amruta Fadnavis Tweet Slamming MahaVikas Aghadi Maharashtra
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amrita Fadnavis, the wife of former chief minister and Maharashtra state opposition leader Devendra Fadnavis) या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. सामाजिक (Social), सांस्कृतिक (Cultural), राजकीय (Political Issues) विषयांवर त्या सातत्याने भाष्य करत असतात.

आपल्या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी केलेल्या टिपण्ण्यांची सोशल मीडियावर तुफान चर्चा होते. आजचे त्यांचे ट्वीटही तसेच आहे. या ट्वीटमधून त्यांनी महाविकास आघाडी (MahaVikasAghadi) सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांनी काही प्रश्न ट्वीट केले आहे. ५०-५० मार्कांचे हे दोन प्रश्न अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडी सरकारमधल्या काही नेत्यांबद्दलचे आहेत.

आपल्या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस म्हणतात की, “थोडक्यात उत्तर द्यावे… ५० मार्क्स; Naughty नामर्द, बिगड़े नवाब, नन्हें पटोले… या जमाती एकत्रित कोठे पाहिल्या जाऊ शकतात ? रिक्त स्थानो की पूर्ति करो… ५० मार्क्स! शराब नही होती! हरामख़ोर का मतलब है और सुनने में आया है _नामर्द है!”

त्यांच्या या ट्वीटवर अनेकांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी पातळी सोडून बोलत असल्याची थेट तक्रार केली आहे. तर “आपण टोकाची राजकीय टिपण्णी करून जनतेचा रोष ओढवून घेऊ नये, समाजोपयोगी कामे करत राहा, राजकीय टिपण्णी करू नये”, असा सल्लाही काही जणांनी दिला आहे. तर काही जणांनी मात्र त्यांच्या या ट्वीटवर समर्थनार्थ आपले मत कमेंट्स द्वारे व्यक्त केले आहे.

Mumbai-Pune Expressway वर भीषण अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू : कारचा चक्काचूर

See also  Today’s Horoscope : 'असा' असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन, शनिवार, दि. 03 सप्टेंबर 2022

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  NIA च्या रडारवर ‘डी कंपनी’; दाऊदच्या शार्प शूटर्सशी निगडीत 20 ठिकाणी छापेमारी

Share on Social Sites