दुर्दैवी!; नाशिक-नंदुरबार एसटी बसने विद्यार्थिनीला चिरडले

दुर्दैवी!; नाशिक-नंदुरबार एसटी बसने विद्यार्थिनीला चिरडले l Girl dies in accident near old CBS Nashik
दुर्दैवी!; नाशिक-नंदुरबार एसटी बसने विद्यार्थिनीला चिरडले l Girl dies in accident near old CBS Nashik
Share on Social Sites

नाशिक । Nashik :

एसटी महामंडळाच्या बसने धडक दिल्याने एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. सीबीएस (Nashik Bus Accident) भागात आज दुपारी हा प्रकार घडला.

प्राप्त माहितीनुसार, नाशिक येथून नंदुरबारकडे जाणारी बस क्र. (MH 15 BL 3445) सीबीएस बाहेर पडताना सिग्नल ओलांडत असणार्‍या २१ वर्षींय वैशाली गायकवाड (Vaishali Gaikwad Accident) नामक विद्यार्थिनीला जोरदार धडक दिली.

सदर विद्यार्थिनीला गंभीर दुखापत झाली. तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मात्र तिला मृत घोषित करण्यात आले. सदर घटनेबद्दल हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Nashik Crime : प्रियकराने तिचं लग्न मोडलं, ‘ती’ ने थेट त्याला जिवंत जाळलं

See also  अनिल परब ED च्या जाळ्यात; 'या' 7 ठिकाणी छापेमारी

Share on Social Sites