
मुंबई l Mumbai :
कोरोनाचा काळ (Corona Time Period) आता संपल्यात जमा झाला असतानाच आता आणखी एक नवा कोरोनाचा व्हेरियंट (Corona new variant) भारतात पहिल्यांदाच आढळून आला आहे.
College Reopen : ठरलं! राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा गजबजणार
XE नामक हा व्हेरियंट असून तो आज (दि. 06) मुंबईत आढळून आला. 367 नमुन्यांची चाचणी केल्यानंतर यांपैकी एक रुग्ण या नव्या XE व्हेरियंटचा (XE Variant) संसर्गबाधित आढळून आला आहे. इंडिया टुडेने मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
https://twitter.com/AnanyaJamwal2/status/1511690743328370694
हा नवा XE व्हेरियंट ओमिक्रॉनपेक्षाही (Omicron) जास्त पसरणारा असल्याचे सांगितले जात आहे. हा व्हेरियंट पहिल्यांदा युनायटेड किंगडममध्ये (United Kingdom UK) आढळला होता. ताज्या सिरो सर्व्हेच्या अहवालानुसार, मुंबई महापालिकेने म्हटले की, मुंबईतील 230 नमुने सिरो सर्व्हेसाठी (Siro survey) पाठवण्यात आले होते, यांपैकी 21 रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागलं होतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर राष्ट्रवादीची भाजपसोबत युती?, शरद पवारांनी दिल ‘हे’ स्पष्टीकरण
या रुग्णांना ऑक्सिजन (Oxygen) किंवा आयसीयूची (ICU) गरजही भासली नव्हती. यांपैकी XE व्हेरियंटचा एक रुग्ण तर आणखी एक कप्पा व्हेरियंटचा (Kappa Variant) रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, जे 21 रुग्ण रुग्णालयात दाखल झाले होते त्यांपैकी नऊ जणांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतलो हेते. तर इतर सर्वांनी एकही डोस घेतला नव्हता.
VAT कमी केल्याचा दिलासा पाच दिवस टिकला, CNG, PNG त ‘इतक्या’ रुपयांची दरवाढ
हा नवा XE व्हेरियंट ओमिक्रॉन BA.1 आणि BA.2 या दोन्ही व्हर्जन्सच्या म्युटंट हायब्रिड व्हर्जन (Mutant Hybrid Version) आहे. सध्या जगभरात या व्हेरियटंचे खूपच कमी संसर्गबाधित आढळून आले आहे. जागतीक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, हा नवा व्हेरियंट ओमिक्रॉनपेक्षआ 10 टक्के जास्त संसर्गकारक आहे.
https://twitter.com/Pbndtv/status/1511691402077302793