
नाशिक । Nashik :
शहरातील सुप्रसिद्ध अभिनव भारत मंदिराच्या (Abhinav Bharat Mandir, Nashik) नूतनीकरणासाठी आपण सलग चार वर्षे प्रयत्न केले असताना खा. हेमंत गोडसे (MP Hemant Godse) त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत असल्याची बाब आ. देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) यांनी विधानसभेत (Legislative Assembly) स्पष्ट केली.
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (state tourism minister Aditya Thackeray) यांच्यासमोर कागदपत्रे वाचून दाखवत आ. फरांदे यांनी खा. गोडसे यांच्या या केविलवाण्या प्रयत्नांबद्दल तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. खा. गोडसे यांनी अभिनव भारत मंदिराला कधीही साधी भेट सुद्धा दिली नाही.
‘तो’ नदीत उडी मारणार तेच तरुणाने धाव घेऊन हात पकडला, पाहा नाशिकचा थरारक VIDEO
आता निधी मिळणार म्हटल्यानंतर श्रेयवाद आणि प्रसिद्धीसाठी आपल्या नावाचे घोडे दामटत आहेत, हे पाहून आ. फरांदे विधानसभेत आक्रमक झाल्या. त्यांनी थेट आदित्य ठाकरेंसमोरच हे सारे प्रकरण मांडले.
दोन दिवसांपूर्वी अभिनव भारत मंदिराला पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी निधी दिला. त्यासाठी खा. गोडसे यांनी प्रयत्न केला, अशा बातम्या प्रसृत झाल्याने होत्या. दरम्यान, हा निधी आ. फरांदे यांनाच दिला जाणार असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आजपासून १२ ते १४ वयोगटासाठी लसीकरण; जाणून घ्या कोठे मिळणार डोस
फडणवीस सरकारकडून 1 कोटी (1 crore from Fadnavis government)
नाशिक (Nashik) येथील अभिनव भारत मंदिराचे नूतनीकरण करावे याची मागणी 1968 झाली स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Freedom fighter Vinayak Damodar Savarkar) यांनी केली होती. गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हा विषय आ. फरांदे यांच्या प्रयत्नातून मार्गी लागला. या प्रकल्पासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Former Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या काळात 1 कोटी रुपयांचा निधी दिला गेला. त्याचा कार्यारंभ आदेश देऊन काम प्रगतिपथावर आहे.
पोलीस चौकीतील ओली पार्टी भोवली; ‘ते’ चार मद्यपी पोलीस थेट निलंबित