एक ब्रिटिश चॅरिटी संस्था (British Charity) अशा लोकांचा शोध घेत आहे जे अंटार्क्टिकामध्ये (Antarctica) पाच महिने घालवण्यास आणि जगातील सर्वात दुर्गम पोस्ट ऑफिसमध्ये काम करण्यास इच्छुक आहे. गौडियर बेटावर (Gaudier Island) काम करण्यासाठी निवडलेल्या उमेदवारांनी पोर्ट लॉकरॉय पोस्ट ऑफिस (Port Lockroy Post Office), म्युझियम (Museum) आणि गिफ्ट शॉप (Gift shop) चालवावे लागेल.
एका वृत्तसंस्थाच्या म्हणण्यानुसार, कोरोना (Corona Pandemic) नंतर पहिल्यांदाच ही साइट लोकांसाठी खुली केली जाईल. UK अंटार्क्टिक हेरिटेज ट्रस्ट (Antarctic Heritage Trust), एक चॅरिटी संस्था (Charity), येथे हंगामी पोस्टमास्टर पाठवते. ऐतिहासिक वास्तू आणि अंटार्क्टिकाच्या कलाकृतींची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. (A chance to spend five months on Antarctica, will get the job of counting Penguins)
Dream of waking up & seeing Antarctica in all its glory? Penguins plodding around, the sun peeping over snow topped mountains. A job like no other. Join us & help protect Antarctica's heritage & conserve its precious environment. Apply by 25 April. https://t.co/NPSf6dKLdi pic.twitter.com/GmJYIq5w1m
— UK Antarctic Heritage Trust (@AntarcticHT) April 4, 2022
(United Kingdom Antarctic Heritage Trust UKAHT) ने ट्विटरवर लिहिले, “सकाळी अंटार्क्टिकाला उठून तिथलं सर्व सौंदर्य पाहण्याचं तुमचं स्वप्न आहे का? पेंग्विन आजूबाजूला फिरत आहेत आणि बर्फाच्छादित पर्वतांमधून सूर्य डोकावत आहेत. यासारखे दुसरे कोणतेही काम नाही. आमच्यात सामील व्हा! कृपया अंटार्क्टिकाच्या वारशाचे रक्षण करा आणि येथील पर्यावरणाचे रक्षण करा. दि. 25 एप्रिल ही या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.”
MPSC Main Examination : महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षा 2020 मुलाखतीच्या तारखा जाहीर
एक वृत्तसंस्थेच्या मते, निवडलेल्या व्यक्तीला नोव्हेंबर 2022 ते मार्च 2023 पर्यंत तळावर राहण्याची संधी मिळेल. अंटार्क्टिकासाठी हे उन्हाळ्याचे महिने आहेत जेव्हा येथील तापमान सामान्यपेक्षा जास्त असते.
उच्चशिक्षित तरुणाचा भलताच कारनामा; Play Boy बनायला गेला अन् बापाचे 17 लाख गमावून बसला