मुंबई । Mumbai :
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात निवडणुका घेणे अवघड असल्याचे कारण देत राज्य निवडणूक आयोगाने (State Election Commission) त्यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र हे सर्वोच्च न्यायालयात सादर केले आहे.
निवडणुका जर पुढे ढकलल्या गेल्या, तर महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi Government) हा मोठा दिलासा असेल. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे सरकारला ओबीसी आरक्षण (OBC Reservation) लागू करण्यासाठी वेळ मिळणार आहे. (State Election Commission filed an Affidavit in the Supreme Court to take local body elections after Monsoon)
सावधान! राज्यात पुढील 5 दिवस धोक्याचे… देशातील 70 टक्के भागांत वाहणार भयंकर उष्णतेची लाट
राज्य सरकारला दिलासा मिळणार
ओबीसी आरक्षणासंदर्भातील सुनावणी येत्या दि. 4 मे रोजी होणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या या प्रतिज्ञापत्रामुळे राज्य सरकारला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जर हे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मान्य केले तर याचा मोठा फायदा हा सरकारला होणार आहे.
ओबीसी राजकीय आरक्षणाचा वाद उफाळल्यापासून मविआ सरकारच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. निवडणुका पुढे ढकलाव्या यासाठी मविआ सरकारने अनेक प्रयत्न देखील केले होते. आता दि. 4 मे रोजी ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुणावणी होणार आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाची ही भूमिका सरकारसाठी दिलासादायक मानली जात आहे. आता सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाच्या प्रतिज्ञापत्रावर काय निर्णय देते हे पाहावे लागणार आहे.
महाराष्ट्रात दंगल घडवण्याचा कट?, धुळ्यात चौघांकडून तब्बल 89 तलवारी, 1 खंजीर जप्त
प्रतिज्ञापत्रात पावसाळा हाच मुख्य अडसर
पावसाळ्यात निवडणुका घेणे कठीण आहे. कारण, महाराष्ट्रात पावसाळ्यात वादळी-वारा आणि पाऊस मोठ्या प्रमाणावर असतो. त्यामुळे या दिवसांमध्ये निवडणुका घेणे कठीण होईल. दि. 4 मे रोजी जर ओबीसी आरक्षणावर निर्णय आला तर, त्याचे संपूर्ण नियोजन करण्यात जून (June) आणि जुलै (July) जाईल. त्यामुळे जून-जुलैमध्ये निवडणुका घेणे शक्य नाही. कोकणात ज्या प्रकारचा पावसाळा असतो त्या दरम्यान निवडणुका घेणे कठीण आहे, असे कारण निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या पत्रात दिले आहे.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
ShareChat वरील मैत्री भोवली, पिडीतेवर वारंवार बलात्कार; नाशकातील धक्कादायक घटना
Today Rashibhavishya 11 August 2022 : 'या' राशींसाठी खूप चांगला जाणार आजचा दिवस,...
Video : प्रतीक्षा संपली! OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन 'या' तारखेला होणार लाँच...
यंदाचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरणाचा मान नाशिकला; राज्यपाल, मुख्यमंत्रीही र...