Improve Memory Tips in Marathi : तुम्हीही विसरता गोष्टी? ‘स्मरणशक्ती’ तीक्ष्ण करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टीप्स

Important tips in Marathi how to Improve Memory
Share on Social Sites

मुंबई | Mumbai :

आजच्या व्यस्त जीवनामुळे अनेक गोष्टी विसरण्याचा प्रसंग तुमच्यासोबतही अनेकदा घडला असेल. आपल्या वाहनाची चाबी विसरणे, मोबाईल विसरणे किंवा इतर दैनंदिन जीवनात लगाणाऱ्या वस्तू आपण कधीकधी सपशेल विसरून जातो.

काही लोकांना कमी स्मरणशक्तीमुळे (Poor Memory problem solution) घरच्या अथवा ऑफिसच्या महत्वाच्या गोष्टी लक्षात राहत नाही. त्यामुळे, अनेकवेळा मोठी गैरसोय होते. म्हणून तज्ञांकडून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पोषक आहार आणि भरपूर व्यायाम करण्याचा सल्ला दिला जातो. (How to improve memory)

स्मरणशक्तीत वृद्धी करण्यासाठी पोषक आहार आणि व्यायाम नक्कीच फायदेशीर ठरू शकतात. आहारतज्ज्ञांनी देखील स्मरणशक्ती सुधारण्यासाठी सल्ला दिला आहे. स्मरणशक्ती तीक्ष्ण करण्यासाठी आणि ग्रे सेल (Gray Cells) जपण्यासाठी नेमके कोणते उपाय जाणून घेऊयात. (Important tips in Marathi how to Improve Memory)

How to Remove Odor From Shoes : पावसाळ्यात बुटांचा कुबट वास येतो? जाणून घ्या ‘हे’ 5 उपाय, दुर्गंधी होईल गायब

1) मानसिक व्यायाम (Mental exercise)

मन आणि स्मरणशक्तीचा व्यायाम करू शकणारे सराव जसे कोडी सोडवणे, पुस्तके वाचणे किंवा नवीन भाषा शिकणे, याने स्मरणशक्ती सुधारण्यात मदत होऊ शकते.

2) योग्य झोप (Proper Sleep)

दिवसातून 7 ते 8 तासांच्या योग्य झोपेमध्ये मेंदूत माहिती साठवण्याची आणि त्यावर प्रक्रिया होण्याची क्रिया योग्यरित्या होते आणि स्मरणशक्ती चांगली राहाते.

3) आवड (Passion)

जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला आवडते तेव्हा त्यात चांगले होण्यासाठी आपण अनेकदा प्रयत्न करतो. याने मेंदूमध्ये हार्ड वायर्स (Hard Wires) निर्माण होतात आणि स्मरणशक्ती सुधारते.

तुमची मुले देखील Kinder Joy खातात का?, मग ही बातमी तुमच्यासाठी, तक्रारीनंतर कंपनीने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

4) पौष्टिक आहार (Nutritious diet)

आहारात अँटि-ऑक्सिडेंटचे (Antioxidant) प्रमाण अधिक असलेली फळे, भाजीपाला, ओमेगा 3 फॅट (Omega 3 fat) असेले अन्न आणि फायबर असलेल्या धान्यांचा समावेश करावा. यांच्या सेवाने मन तीक्ष्ण करण्यास मदत होते.

5) मद्यपान (Drinking)

मद्यपानाचे सेवन टाळावे. मद्यपान केल्याने मेंदूच्या पेशी नष्ट होतात, सतर्कता आणि स्मरणशक्ती कमी होते, असे पोषणतज्ज्ञाचे म्हणणे आहे.

6) ध्यान करा आणि ताण घेऊ नका (Meditate and Don’t stress)

ध्यान एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारण्यास मदत करते. तसेच ताण हे स्मरणशक्तीसाठी धोकादायक ठरू शकते, त्यामुळे ताण घेऊ नये अशाही सूचना अंजली यांनी केल्या आहेत.

7) तंबाखू, अमली पदार्थांपासून दूर राहणे (Stay away from Tobacco, drugs)

मद्यपान, तंबाखू आणि अमली पदार्थांच्या सेवनाने स्मरणशक्तीवर नकारात्मक परिणाम होतात.

8) फास्ट फूड टाळणे (Avoid fast food)

फास्ट फूडमध्ये पोषक तत्वे नसतात, त्यामुळे स्मरणशक्तीवर विपरित परिणाम होऊ शकतात. म्हणून फास्ट फूड टाळले पाहिजे.

(वरील सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता आपल्या तज्ञांचा सल्ला घ्यावा)

See also  CWG 2022 : बॉक्सिंगमध्ये भारताची सुवर्ण हॅटट्रिक, निखत झरीनचाही 'गोल्डन पंच'

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  RTE राखीव जागांबाबत सरकारचे धोरण कळेना; वारंवार बदलणार्‍या आदेशाने शाळाही चक्रावल्या

Share on Social Sites