YouTuber’s Village : भलतंच भारी गाव! प्रत्येक घरात एकतरी YouTuber; एकाने चक्क SBI ची नोकरी सोडली, एवढी कमाई?

YouTuber's Tulsi Village news
Share on Social Sites

रायपूर । Raipur :

आजकाल लॉकडाऊन पासून व्हिडीओज बनवण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. प्रत्येक व्यक्तीला असे वाटते की, फक्त एक यशस्वी यूट्युबर (YouTuber) बनणं ही एक मोठी कमाई आहे.

भारतात एक असं गाव आहे जिथे प्रत्येक घरात एकतरी YouTuber आहे. होय, छत्तीसगडची राजधानी रायपूरपासून (Raipur, Chhattisgarh) तिल्दा परिसर (Tilda area) जवळपास 45 किमी अंतरावर तुळशी गाव (Tulsi Village) आहे.

विशेष म्हणजे, या गावात घराघरात एकतरी युट्यूबर आहेच. या गावाची लोकसंख्या जवळपास 3000 आहे. या तीन हजार लोकांपैकी एक हजारांहून अधिक लोक युट्युबर आहेत यावरून तुम्हाला युट्यूबची किती क्रेझ समजू शकते. (Chhattisgarh village turns into YouTubers’ hub; Locals create content for living)

जर तुम्ही या गावात गेलात तर तुम्हाला रस्त्यावर लोक व्हिडीओ बनवताना सहज दिसतील. गावातील लोकच सांगतात की 85 वर्षांच्या आजीपासून ते 15 वर्षांच्या नातवापर्यंत सर्व व्हिडिओसाठी अभिनय करतात. ज्ञानेंद्र शुक्ला (Gyanendra Shukla) आणि जय वर्मा (Jai Verma) हे दोघेही याच गावातील रहिवासी आहेत. आज दोघे युट्यूबवर व्हिडीओ (YouTube Video) बनवतात. दोघांनीही चक्क नोकरी सोडून युट्यूब चॅनल सुरू करून व्हिडिओ बनवायला सुरुवात केली. (The Villlage of YouTubers)

See also  खान्देश हादरलं! बहिणीची हत्या करुन पहाटे उरकले अंत्यविधी.. साक्री तालुक्यातील खळबळजनक घटना

ज्ञानेंद्र सरकारी नोकरी करायचा. तो एसबीआयमध्ये (State Bank of India SBI) नेटवर्क इंजिनिअर म्हणून काम करत होता. आतापर्यंत त्याने तब्बल 250 व्हिडीओ बनवले आहेत आणि त्याच्या चॅनेलवर 1.15 लाख सब्सक्राइबर्स आहेत. जय वर्मा (Jai Verma) यांनी एम.एस्सी (M.Sc) केली असून ते मुलांना शिकवायचे. यातून त्यांना 15 ते 20 हजार रुपये मिळायचे. मात्र त्यांनी यूट्यूब चॅनल सुरू केल्यापासून त्यांना या चॅनलमधून दरमहा 30 ते 35 हजार रुपयांची कमाई होत आहे. या दोघांना पाहून अनेकांना प्रेरणा मिळाली आणि त्यांनी YouTube साठी त्यांनीही कंटेंट बनवायला सुरुवात केली.

पिंकी साहू (Pinky Sahu) एक कलाकार आहे. तिने सांगितल की, जेव्हापासून येथे व्हिडिओ कंटेंट बनवण्याची क्रेझ वाढली आहे, तेव्हापासून महिलांना भरपूर काम मिळू लागले आहे. या व्हिडिओमध्ये ती दीड वर्षांपासून अभिनय करत आहे. जरी महिला घरासमोर फारशा बाहेर पडल्या नाहीत. मात्र यूट्यूबच्या माध्यमातून परिसरातील लोकांच्या विचारात बदल झाला आहे. महिलाही व्हिडिओजमध्ये सहभागी होऊन उत्तम अभिनय करू लागल्या आहेत.

केंद्र सरकारकडून ‘या’ 22 YouTube चॅनेल्सवर बंदी, ४ पाकिस्तानी चॅनेल्सचाही समावेश

See also  आ गया नया फीचर, अब फोन में इंटरनेट के बिना डेस्कटॉप पर 'ऐसे' चलाएं WhatsApp

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  फ्रीजमध्ये 'ति'च्या शरीराचे 35 तुकडे असताना 'तो' त्याच फ्लॅटवर दुसऱ्या मुलींसोबत करायचा सेक्स; वाचा श्रद्धा हत्याकांडाची संपूर्ण कहाणी

Share on Social Sites