बाबो! १०१८ कोटींची रोकड, ड्रग्ज अन् दारु जप्त!… पाच राज्यांमधील अशीही ‘उलाढाल‘

बाबो! १०१८ कोटींची रोकड, ड्रग्ज अन् दारु जप्त!... पाच राज्यांमधील अशीही ‘उलाढाल‘ l Election commission recover Cash Drugs and Liquor of 1018 crore from 5 electoral states
बाबो! १०१८ कोटींची रोकड, ड्रग्ज अन् दारु जप्त!... पाच राज्यांमधील अशीही ‘उलाढाल‘ l Election commission recover Cash Drugs and Liquor of 1018 crore from 5 electoral states
Share on Social Sites

नवी दिल्ली l New Delhi :

निश्चलीकरणानंतर देशात रोख पैशांचे व्यवहार कमी होतील आणि भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी होईल असे बोलले गेले. मात्र, नुकत्याच देशातील पाच राज्यांमध्ये (Five state election) होत असलेल्या निवडणुकांमध्ये हा दावा फोल ठरला आहे.

निवडणूक आयोगाने (Election Commission) या पाचही राज्यांमध्ये हजारो कोटी रुपयांची रोकड (Cash), ड्रग्ज (Drugs) आणि दारू (Liquor) जप्त केली आहे. त्यामुळे निवडणुकीत या गोष्टींचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचे उघड झाले आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधून (Punjab) १०९ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशमधून (Uttar Pradesh) ८ लाख लीटर दारू जप्त झाली आहे.

२०१७ आणि २०२२ ची तुलना केली असता कारवाईत जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात जवळपास चारपट वाढ झाली आहे. २०१७ मध्ये निवडणूक आयोगाने एकूण २९९ कोटी ८४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. १०१८ कोटीवर गेला आहे.

नाशिकचा गड जिंकण्यासाठी पुन्हा ‘संकटमोचक ‘… रावल यांची गच्छंती

पंजाबमधून सर्वाधिक साहित्य जप्त (Most literature seized from Punjab)

निवडणूक होत असलेल्या पाच राज्यांपैकी पंजाबमध्ये सर्वाधिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. पंजाबमध्ये ५१० कोटी रुपयांची रोख रक्कम, ड्रग्ज, दारू आणि इतर बेकायदेशीर साहित्य जप्त करण्यात आले आहे. दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये ३०७ कोटी ९२ लाख रुपयांची रोख रक्कम, मणिपूरमध्ये (Manipur) १६७ कोटी ८३ लाख, गोव्यात (Goa) १८ कोटी ७३ लाख आणि उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) १२ कोटी ७३ लाख रोख रक्कम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले.

८२ लाख लीटर दारू जप्त (82 lakh liters of liquor seized)

२०२२ मध्ये ५ राज्यांच्या निवडणुकीत १४० कोटी २९ लाख रुपयांसह तब्बल ८२ लाख लीटर दारू देखील जप्त करण्यात आली आहे. या दारूची किंमत ९९ कोटी रुपये इतकी आहे. हे सर्व साहित्य निवडणुकीत मतदारांना प्रभावित करण्यासाठी वापरले जाणार होते.

Russia-Ukraine War : धक्कादायक! युक्रेन-पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण

See also  "मुबारक हो, मुंबई मे हमला होनेवाला है"; पोलीसांच्या WhatsApp वर धमकीचा मेसेज

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  'मनसे'ची माघार.. अक्षय्य तृतीयेचा महाआरती कार्यक्रम रद्द; सांगितलं 'हे' कारण

Share on Social Sites