Mohali MMS Leaked : असे बनवले गेले ‘ते’ व्हिडीओ?; समोर आल्या ‘त्या’ वॉशरूममधील त्रुटी

Leaked MMS of girls bathing
Share on Social Sites

मोहाली । Mohali :

चंदीगड विद्यापीठातील (Chandigarh University MMS) व्हिडिओ लीकच्या घटनेनंतर देशात एकच खळबळ माजली असून, या प्रकरणात आता नव्याने अनेक धक्कादायक खुलासे केले जात आहेत. ही घटना शनिवारी (दि. 17) रोजी उघडकीस आल्यानंतर आता या ‘गर्ल्स हॉस्टेल’च्या बाथरूमचे काही फोटो समोर आले असून, त्याद्वारे नव नवे दावे केले जात आहे.

याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी विद्यार्थ्यावर वसतिगृहातील विद्यार्थिनींचे अश्‍लील व्हिडीओ (Mohali Girls bhathroom video) बनवून ते तिच्या कथित प्रियकराला पाठवल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Leaked videos of girls bathing in Chandigarh hostel)

Akshara Singh Viral MMS : आता… भोजपुरी अभिनेत्री अक्षरा सिंहचा MMS लीक; व्हिडीओ व्हायरल

पोलीसांनी विद्यार्थिनीचा मोबाईल, तिची सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आली आहेत. तसेच एकाही मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केला नाही असा दावा विद्यापीठाचे कुलगुरू आरएस बावा (R S Bawa, Chancellor of University) यांनी म्हटले आहे. सात मुलींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या अफवा आहे. कोणत्याही मुलीने असे कोणतेही पाऊल उचलले नाही. या घटनेत एकाही मुलीला रुग्णालयात दाखल करण्यात आलेले नाही, असे त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

पूर्वी ‘त्या’ वसतिगृहात राहत होती मुले

सध्या राहत असलेल्या या हॉस्टेलमध्ये पूर्वी मुले राहत होती. त्यामुळेच येथे तयार केलेल्या ‘वॉशरूम’मधील वरच्या भागात चक्क छतच नाहीये. तसेच दाराखालील बराच भाग मोकळा आहे. त्यामुळे कुणाही येथून फोटो, व्हिडिओ अगदी सहज शुट करू शकतो.

ज्यावेळी हे हॉस्टेल मुलींसाठी सुरू करण्यात आले त्यावेळी मुलींच्या दृष्टीने वॉशरूममध्ये जे आवश्यक बदल करणे गरजेचे होते. ते कॉलेज प्रशासनाकडून करण्यात आले नव्हते असा आरोप तेथील मुलींनी केला आहे. वेळीच बदल केले असते तर, असा प्रकार कदाचित घडलाच नसता असे देखील अनेक मुलींचे म्हणणे आहे.

दरम्यान, ज्यावेळी हे वसतिगृह मुलींसाठी सुरू करण्यात आले त्यावेळी जर, सुरक्षेच्या दृष्टीने या वॉशरुममध्ये आवश्यक बदल केले असते तर, अशा प्रकारची लाजीरवाणी घटना घडली नसती असे मत अनेक मुलींनी व्यक्त केले आहे. या प्रकरणात आतापर्यंत 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. ज्यामध्ये विद्यापीठातील विद्यार्थी, तिचा प्रियकर सनी मेहता (Sunny Mehta) आणि सनीचा मित्र रंकज वर्मा (Rankaj Varma) यांचा सहभाग आहे.

See also  यंदाचा राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरणाचा मान नाशिकला; राज्यपाल, मुख्यमंत्रीही राहणार उपस्थित

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites