Cyrus Mistry Accident Update : ‘ती’ एक चूक बेतली जीवावर! नेमका कसा झाला सायरस मिस्रींच्या कारचा अपघात?

Cyrus Mistry accident update New in Marathi
Share on Social Sites

मुंबई । Mumbai :

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर (Mumbai-Ahmedabad highway) डहाणू तालुक्यातील चारोटीजवळ (Charoti, Dahanu) झालेल्या कार दुर्घटनेत टाटा सन्सचे माजी अध्यक्ष, शापूरजी पालनजी उद्योगाचे व्यवस्थापकीय संचालक, प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री (Cyrus Mistry, former chairman of Tata Sons) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासह या भीषण अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. (Cyrus Mistry Accident death Update, How did Accident of Cyrus Mistrys car happen)

https://twitter.com/PTI_News/status/1566505444331646976?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1566505444331646976%7Ctwgr%5Ef4fc3943c29011ada49dd9c0556d707a7dd5e364%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fnational%2Fcyrus-mistry-death-update-how-did-the-accident-of-cyrus-mistry-car-happen-police-sources-a597%2F

जखमींना उपचारासाठी वापी (Vapi) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी या दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. मृत्यूचे वृत्त समजताच देशभरातील राजकीय व्यक्ती, उद्योगपती, सहकारी, मित्र यांना धक्का बसला.

अपघात नेमका कसा झाला याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एक चूक जीवावर बेतल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामध्ये मृत्यू झालेल्या सायरस मिस्री (Cyrus Mistry Accident Update) आणि त्यांच्या सोबतच्या प्रवाशांनी सीट बेल्ट बांधला नव्हता. त्यामुळेच अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन अपघातस्थळीच त्यांचा मृत्यू झाला.

See also  Australian Open Final : ऐतिहासिक! २१वं ग्रँडस्लॅम जिंकत राफेल नदालने रचला नवा इतिहास

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1566399503179333632

सीट बेल्ट न बांधण्याची चूक सायरस आणि त्यांच्यासोबत असलेल्यांच्या जीवावर बेतली आहे. अपघात झाला तेव्हा मर्सिडीज कार (MH 47 AB 6705) गुजरातहून मुंबईकडे जात होती. सूर्या नदीच्या (Surya River) पुलावर येताच चारोटीजवळ दुभाजकाला कार धडकली. अनाहिता पंडोले (Anahita Pandole) कार चालवत असल्याचे पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगण्यात येत आहे.

अपघातात अनाहिता पंडोले गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यासह त्यांचे पती डॅरियस पंडोले (Darius Pandole) हे देखील जखमी झाले. त्यानंतर या दोघांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच पोलीसांनी अपघाताला अती वेग कारणीभूत असल्याचं म्हटले आहे. कार पुलावर आली तेव्हा ती निर्धारित वेग मर्यादेपेक्षा अधिक वेगाने धावत होती. कार चालकाला नीट अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचंही पोलीसांनी म्हटले आहे.

https://twitter.com/narendramodi/status/1566393147348766721?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1566393147348766721%7Ctwgr%5Ed604c55e27706401b0f6035ccec823a744e39fb7%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.hindustantimes.com%2Findia-news%2Fbig-loss-to-world-of-commerce-industry-pm-modi-on-cyrus-mistry-s-death-101662292272285.html

नेमकं कसा झाला हा अपघात?

  • काल (दि. 04) रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास ते अहमदाबादवरून मर्सिडिजने मुंबईला येत होते. त्यावेळी चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही भीषण दुर्घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
  • चारोटी नाक्याजवळ सूर्या नदीवर बांधलेल्या नवीन पुलावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार पुलाच्या भिंतीला धडकली. ही दुर्घटना एवढी भीषण होती की, मिस्त्री बसलेल्या भागाच्या दिशेने समोरून गाडीचे प्रचंड नुकसान झाले.
  • गाडीत एअर बॅग्स असूनही जोरदार धडकेमुळे मिस्त्री यांचा जागीच मृत्यू झाला. चार प्रवाशांपैकी सायरस मिस्त्री व जहांगीर दिनशा पंडोल (Jehangir Dinsha Pandol) यांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर अनाहिता पंडोल व डेरियल पंडोल हे दोघे गंभीर जखमी झाले. मिस्त्री, जहांगीर यांच्या मृतदेहाचे मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात शवविच्छेदन केले गेले आहे. याचे व्हिडिओ चित्रीकरण केले गेले आहे.
See also  सहकार सुर्य मावळला; माजी मंत्री शंकरराव कोल्हे कालवश

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  Sonali Phogat Death : टिकटॉक स्टार, भाजप नेत्या सोनाली फोगाट यांच अकाली निधन

Share on Social Sites