वर्धा l Vardha :
भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मेडिकल कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Major Car Accident at Wardha, Seven medical college students died on the spot) देवळी (Devali) येथून वर्ध्याला येत असताना सेलसुराजवळ कारला अपघात झाला आहे.
नियंत्रण सुटल्याने सेलसुरा (Selsura) जवळील नदीच्या पुलावरून कार थेट खाली कोसळली. जवळपास ४० फूट उंच असलेल्या पुलावरून कार खाली पडल्याने भीषण अपघात झाला.
सर्व मृतक २५ ते ३५ वयोगटातील असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये गोंदियातील तिरोडा गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहांगडाले (MLA Vijay Rahangdale of Tiroda Goregaon Assembly constituency in Gondia) यांचा मुलगा अविष्कार रहांगडाले (Avishkar Rahangdale) याचाही समावेश आहे.
अविष्कार वर्धा येथे दत्ता मेघे मेडिकल कॉलेज (Datta Meghe Medical College in Wardha) मध्ये एमबीबीएसचा (MBBS) अभ्यास करत होता. रात्री वर्ध्याला परत येत असताना त्यांची कार नदीत कोसळली. या अपघातात त्याच्यासह सातही मित्रांच्या दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच वर्ध्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप (Wardha Sub-Divisional Police Officer Piyush Jagtap), सावंगी पोलीस निरीक्षक (Sawangi Police Inspector) घटनास्थळी तातडीने दाखल झाले आहे. अपघातात दगावलेल्यांचे मृतदेह वर्धा सामान्य रुग्णालयात (Wardha Civil Hospital) शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
महिलांच्या ‘न्यूड डान्स’ प्रकरणी मोठी कारवाई, १० आयोजक आणि ३ डान्सर्सना अटक