मुंबई l Mumbai :
शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात (Teacher Eligibility Test scam) रोज नव नवीन खळबळजनक माहिती समोर येत असतानाच आता नवीन खुलासा समोर आला आहे.
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२१ म्हणजेच टीईटीसाठी (Maharashtra Teacher Eligibility Test 2021(TET) अपात्र ठरलेल्या ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पैसे घेऊन टीईटी परीक्षार्थींना पात्र ठरवण्यात आल्याचे सायबर पोलिसांच्या तपासामध्ये समोर आले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० (Maharashtra State Examination Council in 2019-20) मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत अपात्र ठरलेल्या ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन उत्तीर्ण करण्यात आल्याच्या या खुलाशामुळे एकच खळबळ उडाली आहे.
२०१८ मध्ये झालेल्या परीक्षेतही मोठ्या प्रमाणात अपात्र परीक्षार्थ्यांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठवरण्यात आल्याची शक्यता असल्याने या परीक्षांचाही तपास केला जात आहे. या प्रकरणाचा तरपास करताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांना देण्यात आलेली माहिती आणि मूळ निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांकडून केली जात आहे.
7,880 students have passed TET 2019-20 exam through scam. Details have been revealed during the investigation of the TET exam scam by #Pune city police. The city police will share this data with the state government for action. #Maharashtra
— Ali shaikh (@alishaikh3310) January 28, 2022
२०१९-२० च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ जणांना पात्र असल्याचा निकाल लावण्यात आलेला. मात्र पोलिसांनी प्रत्यक्ष निकाल पडताळून पाहिल्यानंतर तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र असल्याचे समोर आले. असे असतानाही या सर्वांना पात्र असल्याचे दाखवण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.
२०१३ पासून टीईटीच्या माध्यमातून झालेल्या भरतीमधील शिक्षकांची प्रमाणपत्रे खरी आहेत का याची पडताळणी करण्याचा निर्णय शिक्षण परिषदेने नुकताच घेतलाय. यासाठी राज्यामधील सर्व जिल्हा परिषदा, महानगरपालिकांमार्फत चालवल्या जाणाऱ्या शाळांना तपासासंदर्भातील आदेश देण्यात आले आहे. पुणे सायबर पोलीस (Pune Cyber Police) सध्या २०१८ आणि २०२० मधील टीईटी घोटाळ्याचा तपास करत आहेत.
तरी या परीक्षेमध्ये २०१३ पासूनच घोटाळा होत असल्याचा आरोप केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर मागील आठ वर्षांचे निकाल आणि प्रमाणपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील १५ दिवसांमध्ये राज्यातील साडेपाच हजार शिक्षकांनी आपली प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडे (Maharashtra State Education Council) पाठवण्यात आली आहे.
खळबळजनक! व्हिडीओ शूट करत ३ जवानांचा महिलेवर सामूहिक बलात्कार