आनंदवार्ता : नाशिकमधील ४१ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी १६२ कोटींचा निधी मंजूर; दुष्काळी पट्ट्याला दिलासा

नाशिकमधील ४१ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी १६२ कोटींचा निधी मंजूर; दुष्काळी पट्ट्याला दिलासा l 162 crore sanctioned for 41 villages water supply scheme in Nashik district Yeola
नाशिकमधील ४१ गावे पाणीपुरवठा योजनेसाठी १६२ कोटींचा निधी मंजूर; दुष्काळी पट्ट्याला दिलासा l 162 crore sanctioned for 41 villages water supply scheme in Nashik district Yeola
Share on Social Sites

नाशिक l Nashik :

नाशिक जिल्ह्यातील येवला (Yeola, Nashik District) या अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील (Drought Prone) राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली असून यासाठी १६२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तर धुळगावसह (Dhulgaon) १८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनाही लवकरच मार्गी लावण्यात येणार असून याबाबत तातडीने तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ (Nashik District Guardian Minister Chhagan Bhujbal) यांच्या मागणीनुसार पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Ministry in the presence of Water Supply Minister Gulabrao Patil) यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक पार पडली.

यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला प्रशासकीय मान्यता देऊन याबाबतचे आदेश मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे सुपूर्द केले.

Nashik Crime : कुलसचिव पिता, डॉक्टर पुत्राचा निर्घृण खून, दुहेरी हत्याकांडाने नाशिक हादरले : ‘अशी’ झाली गुन्ह्याची उकल

जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्याला मोठा दिलासा (relief to the drought stricken district)

येवला मतदारसंघातील अवर्षणप्रवण व दुष्काळी पट्ट्यातील राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे मुख्य अभियंता (Chief Engineer of Maharashtra Jeevan Pradhikaran Department) यांच्याकडून तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतर प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव शासनाला पाठविण्यात आला होता.

या प्रस्तावाच्या मंजुरीसाठी तसेच धुळगावसह १८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना मार्गी लावण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे बैठक लावण्याची मागणी केली होती. त्यानुसार बैठक पार पडली. बैठकीत राजापूरसह ४१ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेस मान्यता देण्यात आली आहे. धुळगावसह १८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.

कुठून उचलणार पाणी?

कायम दुष्काळाच्या छायेत राहिलेला येवला तालुका टँकरमुक्त करण्याचा प्रयत्न मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून केला जात आहे. राजापूरसह ४१ गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व धुळगावसह अठरा गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर येवला टँकरमुक्त होणार आहे. या योजनेसाठी नांदूर मधमेश्वर धरणातून (Nandur Madhameshwar Dam) पाणी उचलले जाणार आहे. यासाठी ३.७३७ दलघमी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्याचबरोबर नांदूरमधमेश्वर धरणातून हे पाणी शुद्धीकरणासाठी येवला तालुक्यातील पन्हाळसाठे येथे आवश्यक असलेली जागा खासगी वाटाघाटीतून उपलब्ध करण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी हे कार्यवाही करत आहेत.

लवकरच बस हवेत उडताना दिसणार, गडकरींचे भरसभेत जनतेला आश्वासन

कोणत्या गावांना होणार लाभ ?

सदर प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमध्ये तालुक्यातील राजापूर (Rajapur), ममदापूर (Mamdapur), रेंडाळे (Rendale), अंगुलगाव (Angulgaon), डोंगरगाव (Dongargaon), देवदरी (Devdari), खरवंडी (Kharwandi), रहाडी (Rahadi), पिंपळखुटे तिसरे (Pimpalkhute Tisare), पन्हाळसाठे (Panhalsathe), वाघाळे (Vaghale), आहेरवाडी (Aherwadi), कोळम खुर्द (Kolam Khurd), पांजरवाडी (Panjarvadi), जायदरे (Jaydare), हडपसावरगाव (Hadapsavargaon), वाईबोथी (Vaibothi), खामगाव (Khamgaon), देवठाण (Devthan), गारखेडा (Garkheda), भुलेगाव (Bhulegaon), मातुलठाण (Matulthan), कौटखेडे (Kautkhede), आडसुरेगाव (Adulsaregaon), धामणगाव (Dhamangaon), लहीत (Lahit), गोरखनगर (Gorakhnagar), वसंतनगर (Vasantnagar), चांदगाव (Chandgaon), भायखेडा (Bhaykheda), कोळम बु. (Kolam Bu.), कोळगाव (Kolgaon), कूसमाडी (Kusvadi), नायगव्हाण (Naygavhan), खिर्डीसाठे (Khirdisathe ), महालगाव (Mahalgaon), गणेशपूर (Ganeshpure), कासारखेडे (Kasarkhede), दुगलगाव (Dugalgaon) व बोकटे (Bokate) या ४१ अवर्षणप्रवण क्षेत्रातील गावांचा समावेश आहे. पन्हाळसाठे (Panhalsathe) येथून ग्रॅव्हीटीद्वारे सर्व गावांना पाणीपुरवठा होणार आहे.

अतिरिक्त भार का? (Why extra load?)

येवला तालुक्यातील अडतीसगाव (Adatisgaon) प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर इतर गावे जोडल्यामुळे या योजनेवर अतिरिक्त भार निर्माण झालेला आहे. या योजनेतील काही गावांचा समावेश धुळगांवसह १७ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत करण्याच्या सूचना देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिलेल्या आहेत. त्यानुसार या योजनेचे मंजुरीचे काम देखील प्रगतीपथावर आहे. या योजनेसाठी ५८ कोटी ८१ लक्ष इतका निधी प्रस्तावित करण्यात आलेला आहे. सदर योजनेचा तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले असून या योजनेचा देखील मार्ग मोकळा झाला आहे.

शिवसेनेवर शोककळा!; बाळासाहेब ठाकरेंचे सहकारी, सच्चे शिवसैनिक सुधीर जोशी यांचे निधन

१७ गावे कोणती? (What are 17 villages?)

येवला तालुक्यातील धुळगाव (Dhulgaon) व १७ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत धुळगाव (Dhulgaon), पिंपळगाव लेप (Pimpalgaon Lep), एरंडगाव खु. (Erandgaon Khu.), एरंडगाव बु. (Erandgaon Bu.), जळगाव नेऊर (Jalgaon Nevur), नेऊरगांव (Nevurgaon), देशमाने बु. (Deshmane Bu.), मानोरी बु. (Manori Bu.), शिरसगाव लौकी (Shirasgaon Lauki), सतारे (Satare), भिंगारे (Bhingare), पुरणगाव (Purangaon), मुखेड (Mukhed), जऊळके (Javulke), चिंचोली बु. (Chincholi Bu.), चिंचोली खु. (Chincholi Khu.), सताळी (Satali), बदापूर (Badapur) या गांवाचा समावेश आहे. या सर्व प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण येवला तालुका हा टँकरमुक्त होणार आहे. त्याचप्रमाणे यशस्वीपणे चालू असलेली ३८ गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतील प्रत्येक झोन मधील पाणी उपसा पर्यायी सयंत्रे अकार्यक्षम आणि नादुरुस्त झाले आहे. त्याची सुद्धा दुरुस्ती आणि पंप हाऊस मधील पंप बदलीकरणे गरजेचे आहे अशी सूचना देखील पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

See also  Ganesh Chaturthi 2022 : बाप्पांच्या आगमनासोबतच होत आहे शुक्राचे गोचर, ‘या’ चार राशींवर असते गणरायाची विशेष कृपा

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?


Share on Social Sites