मुंबई l Mumbai :
बॉलिवूडचे दिग्गज संगीतकार आणि गायक बप्पी लहरी (Veteran Bollywood musician and singer Bappi Lahiri) यांचे आज (दि. १६) बुधवारी सकाळी निधन झाले आहे. मुंबईतील (Mumbai) एका हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
बप्पी लहरी यांचा जन्म दि. २७ नोव्हेंबर १९५२ मध्ये झाला होता. बॉलिवूडमध्ये ७० च्या दशकात डिस्को (Disco) आणि रॉक (Rock) म्युझिकच्या माध्यमातून बप्पी लहरी यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली होती. अंगावर घातलेल्या सोन्याच्या दागिन्यांमुळेही बप्पी लहरी यांची क्रेझ होती.
Singer-composer Bappi Lahiri dies in Mumbai hospital, says doctor
— Press Trust of India (@PTI_News) February 16, 2022
बप्पी लहरी यांनी त्यांच्या कारकिर्दीत बॉलिवूडमध्ये (Bollywood) अनेक हिट गाणी गायली. रिएलिटी शो मध्ये जज म्हणूनही त्यांनी भूमिका निभावली होती. शरीरावर प्रचंड सोने, गळ्यात चेन, हातात अंगठ्या अशी त्यांची प्रतिमा होती.
अमेरिकन रॉकस्टार एल्विस प्रेस्लीपासून (American rockstar Elvis Presley) त्यांना अंगावर सोने घालण्याची प्रेरणा मिळाली. २०१४ च्या निवडणुकीत बप्पी लहरी यांनी भाजपाच्या (BJP) तिकिटावर निवडणूक लढवली होती.
परंतु त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार सन २०१४ मध्ये त्यांच्याकडे ७५४ ग्रॅम सोने आणि ४.६२ किलो चांदी होती.
भीषण अपघातात अभिनेत्याचा जागीच मृत्यू; कसा वाचला बाजुलाच बसलेल्या गर्लफ्रेंडचा जीव?
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
Today’s Horoscope : जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशी मंथन, रविवार, 21 ऑगस्ट 2022
Today’s Horoscope : जाणून घ्या आजचे पंचांग अन् राशी मंथन, मंगळवार, 30 ऑगस्ट 2022
एकनाथ शिंदे अन् भाजपचं सरकार बनतंय पण... 'या' दोन खात्यांवर फिस्कटतंय?
आदिवासी पाड्यावरील जीवघेणी हेळसांड थांबता थांबेना; रुग्णाला खांद्यावर घेऊन अडीच ...