सौ बात की एक बात : आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?; वाचा सविस्तर

पत्रकार परिषदेत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?; वाचा सविस्तर l mp shivsena leader sanjay raut today press conferece shivsena bhavan mumbai
पत्रकार परिषदेत संजय राऊत नेमकं काय म्हणाले?; वाचा सविस्तर l mp shivsena leader sanjay raut today press conferece shivsena bhavan mumbai
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज (दि. १५) पत्रकार परिषद घेऊन थेट भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) आणि त्यांचे नगरसेवक पुत्र निल सोमय्या (Corporator Nil Somaiya) यांच्यावर बॉम्ब टाकले आहेत.

पीएमसी घोटाळ्याच्या (PMC Scam) मास्टरमाईडशी किरीट सोमय्या यांचे संबंध आहेत. सोमय्यांचा मुलगा तर या मास्टरमाईडच्या कंपनीत डायरेक्टर आहे. त्यांनी निकॉन फेज वन (Nikon Phase One) आणि टू असे प्रकल्प उभे केले आहेत. त्यांना पर्यावरणाच्या परवानग्या नाहीत. हरित लवादानं एक्शन घेतली तर त्यावर कारवाई होईल.

LIVE : शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद

आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) माझं आवाहन आहे की, याची ताबडतोब चौकशी करून निल सोमय्या आणि किरीट सोमय्या यांना अटक करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

तसेच पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईडच्या अकाऊंटमधून भाजपला २० कोटींचा निधी गेला असल्याचा दावा ही संजय राऊत यांनी केला आहे.

सहा वाहनांचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

संपूर्ण पत्रकार परिषदेत संजय राऊत नेमकं काय म्हणाले? (What exactly did Sanjay Raut say in the entire press conference?)

  • महाराष्ट्र सरकार (Maharashtra government) पाडण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

  • सरकार पाडण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्रात ठिणगी पडेल आणि पाठीवर वार केले तरी शिवसेना (Shivsena) घाबरणार नाही.

  • भाजपाचे काही प्रमुख लोक मला भेटले, तीन वेळा भेटले. त्यांनी मला वांरवार हे सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही या सरकारच्या प्रवाहातून बाहेर पडा.

  • मन साफ असेल तर कुणाच्या बापालाही घाबरण्याची गरज नाही, असे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) नेहमी सांगायचे.

  • उद्धव ठाकरे यांचे ‘ते’ १९ बंगले दाखवाच, संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांना आव्हान केले.

  • तपास यंत्रणांना हाताशी घेऊन इथे कुणी दादागिरी करू नये, आजची पत्रकार परिषद खरंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • ईडीची (ED) टक्कर शिवसेनेशी आहे, हरियाणातला दूधवाला नरवरला ईडी ओळखते का? नरवर ७ हजार कोटींचा मालक कसा झाला?

  • मी कपडे शिवले तिथेही ईडीचे लोक चौकशीसाठी गेले, तसेच माझ्या मुलीच्या लग्नात मेहंदी, नेलपॉलीश करणाऱ्यांचीही ईडीकडून चौकशी होत असल्याचा संजय राऊत यांनी यावेळी आरोप केला.

  • देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या काळात महाआयटीमध्ये २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊत यांचा आरोप.

See also  Ganesh Chaturthi 2022 : कधी आणि कशी कराल गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना; जाणून घ्या पूजा तयारी, शुभ मुहूर्त, विधी आदींबाबत

आपण ह्या बातम्या वाचल्यात का?

See also  ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर; प्रभाग रचना आणि निवडणुकीच्या तारखा ठरवण्याचे अधिकार आता राज्य सरकारकडे

Share on Social Sites