4 तारखेपासून ऐकणार नाही, शरद पवार, भोंगे अन् बरंच काही… वाचा राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

4 तारखेपासून ऐकणार नाही, शरद पवार, भोंगे अन् बरंच काही... वाचा राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे l MNS Raj Thackerays warning 4th May is ultimatum for Mosque loud speaker Aurangabad
4 तारखेपासून ऐकणार नाही, शरद पवार, भोंगे अन् बरंच काही... वाचा राज ठाकरेंच्या भाषणातील ठळक मुद्दे l MNS Raj Thackerays warning 4th May is ultimatum for Mosque loud speaker Aurangabad
Share on Social Sites

‘मनसे’ची माघार.. अक्षय्य तृतीयेचा महाआरती कार्यक्रम रद्द; सांगितलं ‘हे’ कारण

औरंगाबाद l Aurangabad :

‘आज 1 तारीख आहे, 3 तारखेला ईद आहे, मला कोणतेही सणात विष कालवायचे नाही. त्यानंतर 4 तारखेपासून अवघ्या महाराष्ट्रात ऐकणार नाही. तमाम हिंदू बांधवांनी दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, नीट ऐकलं नाहीतर वाजवाचं, असा इशाराच राज ठाकरेंनी (Raj thackery aurangabad sabha 2022) दिला.

औरंगाबादमध्ये विराट अशा गर्दीत राज ठाकरेंची ऐतिहासिक उत्तर सभा पार पार पडली. या सभेला अभुतपूर्व अशी गर्दी झाली होती. यावेळी बोलत असताना राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना फटकारलं.

अखेर राज ठाकरेंवर ‘या’ कलमान्वये गुन्हा दाखल; गृहमंत्र्यांच्या बैठकीनंतर अटक होणार?

‘आज 1 तारीख आहे, 3 तारखेला ईद आहे, मला कोणतेही सणात विष कालवायचे नाही. त्यानंतर 4 तारखेपासून अवघ्या महाराष्ट्रात ऐकणार नाही. तमाम हिंदू बांधवांनी दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावा, नीट ऐकलं नाहीतर वाजवाचं. सगळ्या हिंदू बांधवांना सांगत आहे. आजही परिस्थिती आहे. आज नाहीतर पुन्हा कधी नाही. ही लोक जर 3 तारखेपासून ऐकली नाही तर पोलिसांकडून परवानगी घेऊन जोरात काम करा. हा विषय कायम निकाली लागला पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले.

‘माझी पोलिसांना विनंती आहे, जर सभेत हे भोंगा सुरू करत असतील तर माझी पोलिसांना विनंती आहे, त्यांच्या तोंडात आताच बोळा कोंबा, जर सरळ सरळ मार्गाने समजत नसेल तर यानंतर महाराष्ट्रात काय घडेल, हे मला माहिती नाही. जे पोलीस अधिकारी आहे, त्यांना सांगतो, ते आताच बंद करा. माझं एक म्हणणं आहे, जर ती ऐकतच नसतील तर एकदा काय ते होऊनच जाऊ द्या, अजिबात शांत बसू नका, संभाजीनगर पोलिसांना हात जोडून विनंती आहे, जर हे असे वागत असतील महाराष्ट्राच्या मनगटात काय ताकद आहे, ते दाखवूनच देऊ’ असा इशाराच राज ठाकरेंनी दिली.

शरद पवार यांच्यावर राज ठाकरेंची टीका (Raj Thackeray criticizes Sharad Pawar)

‘माझ्या आजोबांनी जे लिहून ठेवलंय ते तुम्ही नीट वाचलं ते परिस्थितीला धरुन आहे. व्यक्तीसापेक्ष आहे. जातीपातीत भेद निर्माण करणं नव्हे. हा आपला हिंदू धर्म बांधणारा माणूस होता तो. त्याची पूजा करणारा माणूस होता. त्या धर्मामधल्या ज्या गोष्टी होत होत्या त्यावर बोट ठेवणारा माणूस होता की, ही गोष्ट होता कामा नये. माझ्या आजोबा हे भटभिक्षुकीच्या विरोधात होते. धर्म बांधणारा माणूस होता. म्हणून मी आज पवार साहेबांसाठी काही संदर्भ आणले आहेत. या लोकांनी जातीचं विष पसरवलं.

Video : अभी तो पार्टी शुरू हुई हैं… देशवासियांच्या दुःखाचा पाढा वाचून मोदींवर निशाणा साधणारे राहुल गांधी बारमध्ये ‘ति’च्या सोबत ‘स्पॉट’

‘जात प्रत्येकाला होती. पण दुसऱ्या जातीबद्दलचा द्वेष राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर सुरू झाला. मराठा बांधवाची माथी भडकवायचा. जेम्स लेन नावाच्या माणसाचा पुस्तक काढात. ज्या माणसाने छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देश आणि जगात घराघरापर्यंत पोहोचवले त्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या वृद्धोपकाळात पवार साहेबांनी त्रास द्यायला सुरुवात केली. कशासाठी? तर ते ब्राह्मण आहेत म्हणून. आमच्या घरात कधी जातपात शिकवलं नाही. आम्हाला जातीपातीशी घेणंदेणं नाही. तुमच्या मताच्या राजकाणासाठी हे सगळं धुव्रीकरण करायचं तर रायगडावरची समाधी ही कोणी बांधली? आमच्या शिवछत्रपतींची समाधी ही लोकमान्य टिळकांनी बांधली. टिळकांना तुम्ही ब्राह्मण म्हणून पाहणार आहात का? लोकमान्य टिळकांनी काढलेल्या पहिल्या वृत्तपत्राचं नाव काय? तर मराठा! हे पवार साहेब कधी सांगणार नाहीत’ अशी टीकाच राज ठाकरे यांनी पवारांवर केली.

  • मशिदींवरील भोंगे उतरलेच पाहिजेत, मंदिरावरीलही लाऊडस्पीकर उतरलेच पाहिजेत.

  • अझान देणारे लोक गप्प बसणारे नसतील तर जे कायचे ते होऊन जाऊदे

  • आमच्या सभेवेळी अझान बंद करावी, अन्यथा त्यानंतर काय होईल यासाठी आम्ही जबाबदार नाही.

  • ४ तारखेपासून भोंग्यांचा आवाज ऐकणार नाही, राज ठाकरेंचा पुन्हा अल्टिमेटम

  • रस्त्यावर नमाझ पठण करण्याची परवानगी कोणी दिली?

  • उत्तर प्रदेशमध्ये जर लाऊडस्पीकर उतरू शकतात तर महाराष्ट्रात का नाही?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची सभा औरंगाबाद येथून LIVE

  • लाऊडस्पीकरचा विषय हा तुम्ही धार्मिक पद्धतीने घेतला तर आम्हालाही धार्मिक पद्धतीने उत्तर द्यावे लागेल.

  • लाऊडस्पीकर हा सामाजिक प्रश्न आहे धार्मिक नव्हे

  • मुस्लिम समाजाने हा मुद्दा समजून घ्यावा.

  • महाराष्ट्रात मला दंगली घडवायच्या नाहीत.

  • लाऊडस्पीकर हा नवीन विषय नाही, यापूर्वी अनेकांनी हा विषय मांडला आहे. मी फक्त त्याला पर्याय दिला.

  • शरद पवार यांनी जातीमध्ये विद्वेष वाढवला.

  • शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातींना एकत्र आणले.

  • कुठल्याही जातीची बाजू घेत नाही.

  • शरद पवार यांच्या तोंडून शिवछत्रपतींचे नाव येत नाही.

  • शरद पवार यांना हिंदू शब्दांची ऍलर्जी

  • जातीपातीच्या विषातून आपण दूर राहिले पाहिजे.

  • बाबासाहेब पुरंदरे हे ब्राह्मण होते म्हणून शरद पवार यांनी त्यांना त्रास दिला-राज ठाकरे

  • राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जातीपातीचे राजकारण आणि द्वेष वाढला, राज ठाकरे यांच्याकडून पुर्नरुच्चार

  • महाराष्ट्रात नवरात्रौत्सव साजरे करण्याचे श्रेय प्रबोधन ठाकरे यांचे

  • प्रबोधनकार हे धर्म मानणारे होते, ते भट भिक्षूकांच्या विरोधात होते.

  • शरद पवार यांनी प्रबोधनकारांची सर्व पुस्तकं वाचावीत, ते लेखन व्यक्तिसापेक्ष आहे.

  • सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत सांगितले की शरद पवार नास्तिक आहेत.

  • शरद पवार यांनी जाती जातीत दुही निर्मांण केल्या

  • महाराष्ट्रातले नेते मुद्द्यांवर बोलायचे सोडून गुद्द्यांवर आले आहेत.

  • महाराष्ट्राची अब्रु वेशीवर टांगली जात आहे.

  • आपण महापुरुषांच्या फक्त जयंती आणि पुण्यतिथी साजरे करतो.

  • विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातही सभा होणार

  • मराठवाड्याच्या प्रत्येक जिल्ह्यात माझ्या सभा होणार- राज ठाकरे

  • मुंबईतल्या सभे नंतर अनेक जण फडफडायला लागले. नंतर ठाण्यात उत्तर सभा घ्यावी लागली

  • राज ठाकरे यांच्या भाषणाला सुरूवात

  • लवकरच राज ठाकरे यांच्या भाषणाला होणार सुरूवात

  • राज ठाकरे यांचे सभेच्या ठिकाणी आगमन

  • अयोध्या दौर्‍यावर, भाजप-मनसे युतीवर राज ठाकरे काय बोलणार?

https://twitter.com/_Mr_Deeps_/status/1520785484263342081

See also  Online Loan Apps : 'लोन अ‍ॅप्स'मुळे अनेकजण कर्जाच्या जाळ्यात! मदतीसाठी 'गूगल'ने उचललं 'हे' मोठं पाऊल
See also  सावधान! कोरोनानंतर भारतात आता 'शिगेला'चे थैमान; 58 रुग्ण, एकाचा मृत्यू

Share on Social Sites