अयोध्या । Ayodhya :
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) आज (दि. 15) अयोध्या दौर्यावर आहेत. या दौर्या दरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्रातील रामभक्तांसाठी (Devotees of Ram in Maharashtra) खूप मोठी घोषणा केली आहे. अयोध्या ही खूप पावनभूमी मानली जाते. अयोध्या ही मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांची (Purushottam Shri Ram) जन्मभूमी मानली जाते.
हिन्दू हृदयसम्राट बालासाहेब ठाकरे और इस्कॉन मुंबई के संबंधों को याद करते हुए, इस्कॉन रामनगर के दर्शन के निमंत्रण और प्रेम केलिए मैं आभारी हूं। हरे कृष्ण 🙏 @india_iskcon pic.twitter.com/NH1c1bBUmM
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 15, 2022
या जन्मभूमीत रामलल्लांच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक येतात. यामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) भाविकांची संख्या सर्वाधिक आहे. महाराष्ट्रातील भाविकांची अयोध्येत योग्य सोय व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार (Maharashtra Government) प्रयत्नशील आहे. त्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांच्यासोबत चर्चा करुन महाराष्ट्र सरकार अयोध्येत महाराष्ट्र सदन बांधणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केली.
कोर्टाचे आभार मानतो
मी 2018 मध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena party chief Uddhav Thackeray) यांच्यासोबत पहिल्यांदा अयोध्यामध्ये आलो होतो. तेव्हा त्यांनी पहिले मंदिर फिर सरकार, (Pahle Mandi Fir Sarkar) अशी घोषणा केली होती. त्या घोषणेनंतर योगायोगाने आम्ही नोव्हेंबर 2018 मध्ये आलो. ती घोषणा झाल्यानंतर कदाचित असे पूर्ण घडून आले. त्यानंतर कोर्टाच्या प्रक्रियेला चालना मिळाली. एका वर्षात बरोबर नोव्हेंबर 2019 मध्ये कोर्टाचा निकाल आला. कोर्टाच्या निकालामुळे आज इथे मंदिर निर्माण होत आहे. आम्ही कोर्टाचे आभार मानत आहोत, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
School reopen in Maharashtra : शाळेची घंटा वाजली! राज्यात आजपासून किलबिलाट
इथे फक्त दर्शन घ्यायला आलोय…
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले कि, एक महत्त्वाचे सांगायचे म्हणजे आम्ही इथे दर्शन घ्यायला तर आलेलोच आहोत, आपल्या मनातल्या प्रश्नांना एकच उत्तर आहे. ही आमची तीर्थयात्रा आहे. राजकीय यात्रा नाही. इथे राजकारण करायला आलेलो नाहीत, दर्शन घ्यायला आलेलो आहोत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मला सांगितले आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत उद्धव ठाकरे बोलणार आहेत, पत्रव्यवहार करणार आहेत. या पावनभूमीत महाराष्ट्र सदनसाठी देखील जागा बघणार आहेत. साधारणपणे शंभर खोल्यांचे महाराष्ट्र सदन इथे आम्हाला बनवायचे आहे. महाराष्ट्रातील इथे अनेक भाविक येत असतात. त्यांना राहण्यासाठी एक जागा इथे निर्माण करायची आहे, अशी मोठी घोषणा आदित्य ठाकरेंनी केली. आपल्या सगळ्यांचे स्वागत करत आहोत. गेल्या तीन-चार वर्षाच्या काळात शिवसेना परिवारासोबत अयोध्येत चौथ्यांदा येत आहोत. उत्साह आणि जल्लोष तसाच येत आहे. मंदिर निर्माण होत असताना अजून शिवसैनिक इथे रामलल्लांचे दर्शन घ्यायला आलेले आहेत. आमच्यासोबतच्या उत्साह आणि जल्लोष सर्वांपर्यंत पोहोचवा, अशी सर्व माध्यमांना विनंती करतो, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
रामनगर अयोध्या से ढेर सारा आशीर्वाद मिला और कुछ अविस्मरणीय यादें मिली। आशा है कि बांके बिहारी जी मुझे जल्द ही वापस बुलाएँगे। हरे कृष्ण! 🙏 @india_iskcon pic.twitter.com/LZxID29Gpr
— Aaditya Thackeray (@AUThackeray) June 15, 2022