मुंबई l Mumbai :
सध्या राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना (BJP Vs Shiv Sena) या दोन पक्षात थेट जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. तर राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) भाजपने शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला. शिवसेनेने महागाईवरुनही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जहरी टीका केली, आता या पार्श्वभूमीवर उद्या (दि. 14) सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) एकाच मंचावर येणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमधील जल भूषण इमारत (Jal Bhushan building, Mumbai) आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं (Krantikarak Gallery) उद्घाटन करणार आहेत, या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे पंतप्रधान एकाच मंचावर येणार आहेत. यामुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.
काही गेल्या दिवसापूर्वी, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानचा (Master Dinanath Mangeshkar Smriti Pratishthan) पहिला लता मंगेशकर पुरस्कार (Lata Mangeshkar Award) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर झाला होता. या कार्यक्रमातही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार होते, पण मुख्यमंत्री या कार्यक्रमाला गेले नाहीत.
अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांतला रेव्ह पार्टीत ड्रग्ज घेताना अटक
जल भूषण इमारत, क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) मुंबईमधील जल भूषण इमारत आणि राजभवन येथील क्रांतिकारक गॅलरीचं उद्घाटन करतील. जल भूषण इमारत ही 1885 सालापासून महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान आहे. या इमारतीचे आयुर्मान संपल्यामुळे ती पाडण्यात आली होती, आणि त्या जागी नव्या इमारतीच्या बांधकामाची मंजुरी देण्यात आली होती. भारताच्या राष्ट्रपतींच्याहस्ते ऑगस्ट 2019 मध्ये नव्या इमारतीची पायाभरणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, जुन्या इमारतीची सर्व वैशिष्ट्ये नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत जतन करण्यात आली आहेत.
सन 2016 मध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल विद्यासागर राव (Governor of Maharashtra Vidyasagar Rao) यांना राज भवनामध्ये (Raj Bhavan) एक भुयार सापडले होते. शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी गुप्त ठिकाण म्हणून पूर्वी ब्रिटीश (British) या भुयाराचा उपयोग करत होते. 2019 साली या भुयाराचे नुतनीकरण करण्यात आले. या भुयारात बनवण्यात आलेली गॅलरी महाराष्ट्रातील स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांच्या स्मरणार्थ बनवण्यात आलेले अशा स्वरूपाचे एकमेव संग्रहालय आहे. हे संग्रहालय वासुदेव बळवंत फडके (Vasudev Balwant Phadke), चाफेकर बंधू (Chafekar brother), सावरकर बंधू (Savarkar brother), मॅडम भिकाजी कामा (Madam Bhikaji Kama), व्ही. बी. गोगटे (V. B. Gogte), 1946 मधील नौदल क्रांती (Naval Revolution) आणि अन्य क्रांतीकारकांना श्रद्धांजली अर्पण करते.
पंतप्रधान (PM Narendra Modi) मुंबईत वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स येथे मुंबई (Bandra Kurla Complex, Mumbai) समाचारच्या द्विशताब्दी महोत्सवात देखील सहभागी होणार असल्याचे बोलले जात आहे. दि. 01 जुलै 1822 रोजी फरदुनजी मर्झबानजी (Fardunji Marzbanji) यांच्या हस्ते मुंबई समाचारची एक साप्ताहिक म्हणून छपाई सुरु झाली. त्यानंतर 1832 साली ते दैनिक झाले. हे वृत्तपत्र गेली 200 वर्ष सातत्त्याने प्रकाशित होत आहे. या दुर्मिळ विक्रमाचे स्मरण म्हणून या प्रसंगी एक टपाल तिकीट देखील प्रकाशित केले जाणार आहे. तसेच पुण्यातील देहू येथील संत तुकाराम महाराज (Saint Tukaram Maharaj, Dehu, Pune) यांच्या शिळा मंदिराचे उद्धाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
धक्कादायक! 'The Kashmir Files' पाहून आलेल्या तरुणाचा मेंदूतील नस फुटून मृत्यू
सारे काही सत्तेसाठीच! राज्यातील सत्तासंघर्षात आता फक्त 'हे' दोनच पर्याय शिल्लक
Today’s Horoscope : 'असा' असेल तुमचा आजचा दिवस; जाणून घ्या पंचांग अन् राशी मंथन,...
Maharashtra Rain Update : सावधान! पुढील 'इतके' दिवस अतिमुसळधार पावसाचे, हवामान ख...