
मुंबई l Mumbai :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या आजारपणावर टीका करणारे नामर्द आहेत, अशी जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) यांनी केली.
राऊत म्हणाले की, आजारपण हे कधी कोणावर येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर आजारपणाच्या काळात झालेली टीका ही माणुसकी आणि नीतीमत्तेला धरुन नव्हती. विरोधक नामर्दपणे मुख्यमंत्र्यांवर टीका करत राहिले. राज्यातील जनतेने त्यांना प्रत्युत्तर दिले आहे.
आता तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा सक्रिय झाले आहेत. त्यांनी वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केले. त्यानंतर मुख्यमंत्री शिवतीर्थावरील प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमालाही उपस्थित होते. त्यामुळे राज्यातील जनता उत्साहात आहे.
मात्र, ज्या कोणी मुख्यमंत्र्यांच्या आजारपणावरुन टीकाटिप्णी केली आहे, त्यांच्या अंतरंगात किती घाण आहे, हे दिसून आल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. ते आज (दि. २६ जानेवारी) बुधवारी मुंबईत बोलत होते.
दुर्दैवी! शाळेत ध्वजारोहणावेळी विद्यार्थ्याचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी