नाशिक l Nashik :
नाशिक-त्र्यंबकेश्वर मार्गावरील हॉटेल सोनाली गार्डन (Hotel Sonali Garden on Nashik-Trimbakeshwar Road) येथे दहा वर्षांपूर्वी किरकोळ कारणावरून एकाची लोखंडी गजाने हत्या करण्यात आली होती.
याप्रकरणी पाच जणांना अटक करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी आज शनिवारी (दि. २९) नाशिकच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात (Nashik District and Sessions Court) झालेल्या सुनावणीत यातील पाचही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
खून झाल्यानंतर सातपूर पोलीस ठाण्यात (Satpur Police Station) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक के. आर. पोपेरे (Police Inspector K. R. Popere) यांनी मुख्य आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करत अभ्यासपूर्ण तपास करत दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्याची सुनावणी नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायलयात सुरु होती. आज (शनिवारी) मुख्य न्यायाधीश ए. एस. वाघवसे (Chief Justice A. S. Waghavase) यांनी फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अंमलदार यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून आरोपींना शिक्षा ठोठावली.
जिल्ह्यात गँगवारचा भडका; तुफान राड्यात एकाचा खून, एक जण गंभीर
अशी घडली घटना (This is how Incidence happened)
दि. ०७ डिसेंबर २०११ रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास राहुल भास्कर शेजवळ हे मित्रांसोबत सातपूर येथील सोनाली गार्डनमध्ये पार्टी करत होते. पार्टी झाल्यानंतर हॉटेलसमोर संशयित राकेश मधुकर जाधव (२९), शरद उर्फ दिगंबर बबन नागरे (२५), अनिरुद्ध धोंडू शिंदे (२२), लक्ष्मण छबु गुंबाडे उर्फ बादशहा (२६) आणि दीपक भास्कर भालेराव (२६) सर्व राहणार पिंपळगाव बहुला (Pimpalgaon Bahula), त्र्यंबकेश्वर रोड नाशिक (Trimbakeshwar Road Nashik) यांनी किरकोळ कारणावरून शेजवळ यांच्यासोबत वाद घातला.
याच वेळी शेजवळ यांच्या पाठीवर लोखंडी गजाने तसेच चाकुसारख्या हत्त्याराने वार करत गंभीर जखमी केले होते. या घटनेत शेजवळचा जागीच मृत्यू झाला होता. दरम्यान, याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
वाढदिवसाच्या पार्टीने केला घात.. दोघांचा जागीच मृत्यू; खान्देशातील घटना
INS Vikrant : जय भवानी, जय शिवाजी! नौदलाच्या नवीन ध्वजावर छत्रपती शिवरायांची मोह...
WWE शोकसागरात! ‘या’ दिग्गज रेसलरचे निधन; ३ वेळा आला होता 'हार्ट अटॅक'
'या' सवयीमुळे अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरीचा खेळ खल्लास; CIA ने 'असा' ठरला टिपण्...