होळी, धुळवड धुमधडाक्यात साजरी करा.. विरोधकांच्या टीकेनंतर ठाकरे सरकार बॅकफूटवर

होळी, धुळवड धुमधडाक्यात साजरी करा.. विरोधकांच्या टीकेनंतर ठाकरे सरकार बॅकफूटवर l Maharashtra government cancelled guidelines over celebration for Holi Dhulivandan Rangpanchami
होळी, धुळवड धुमधडाक्यात साजरी करा.. विरोधकांच्या टीकेनंतर ठाकरे सरकार बॅकफूटवर l Maharashtra government cancelled guidelines over celebration for Holi Dhulivandan Rangpanchami
Share on Social Sites

मुंबई l Mumbai :

होळी (Holi) आणि धुळवड (Dhulivandan/Rang Panchami) साजरी करण्यावर महाराष्ट्र राज्य सरकारकडून (Maharashtra State Government) काही निर्बंध लागू करण्यात आले होते.

त्या संदर्भात काल (दि. १६) नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आली होती. मात्र, विरोधकांकडून झालेल्या टीकेनंतर आता राज्य सराकारने आपले निर्बंध मागे हटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरात यंदा होळी, धुळवड/धुलिवंदन मोठ्या उत्साहात आणि धुमधडाक्यात साजरा करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

…तर अशा शाळांची मान्यता रद्द होणार; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

होळी, रंगपंचमी, धुळवड हे सण स्वतः निर्बंध घालून साजरे करा असा सल्ला राज्य सरकारने नागरिकांना दिला आहे. होळी आणि धुलिवंदन साजरी करण्यास कोणतीही सरकारी हरकत नाही. मात्र, दक्षता पाळून साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

स्थानिक पातळीवर असलेल्या प्रशासकीय नियमांचे पालन आवश्यक असल्याचे म्हटले आहे. होळी, धुळवड साजरी करण्याच्या संदर्भात राज्य सरकारकडून नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत.

होळी, धुलिवंदनासाठी राज्य सरकारची नियमावली जारी; ‘हे’ नियम पाळावेच लागतील

नवी नियमावली खालील प्रमाणे :

  • होळी/शिमगा (Holi/Shimga) हा सण संपूर्ण महाराष्ट्रात (Maharashtra Festival) मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी दि, 17 मार्च, 2022 रोजी होळीचा सण आहे. कोविड संक्रमणामुळे (Covid-19) हा सण शक्यतोवर गर्दी न करता कोविड अनुरुप वर्तणूक (Covid Appropriate Behaviour) नियमांचे पालन करुन साजरा करावा.

  • दि. 18 मार्च 2022 रोजी धुलिवंदन व दि. 22 मार्च 2022 रोजी रंगपंचमी हे सण साजरे करण्यात येणार आहेत. या सणानिमीत्ताने एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येत असते. परंतु कोविड-19 चा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी धुलिवंदन आणि रंगपंचमी हे सण साधेपणाने साजरे करावे.

  • होळी/शिमगा सणा निमित्ताने कोकणात (Konkan) पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतू यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक मंदिरातच दर्शनाची व्यवस्था होईल याकरीता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात. तसेच त्याठिकाणी गर्दी होणार नाही व कोविड अनुरुप वर्तणूक (Covid Appropriate Behaviour) नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी

  • कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन (Relief and Rehabilitation), आरोग्य (Health), पर्यावरण (Environment), वैद्यकीय शिक्षण विभाग (Medical Education Department) तसेच संबंधित महानगरपालिका (Municipal Corporation), पोलीस प्रशासन (Police Administration), स्थानिक प्रशासन (Lokal Administration) यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे.

  • तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे.

  • दि. 1 मार्च च्या आदेशानुसार मुंबई पुण्यासारख्या (Mumbai-Pune) 14 शहरांत जर गर्दी 1000 पेक्षा अधिक असेल तर मात्र जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची (District Disaster Management) मंजुरी घ्यावी लागेल.

https://twitter.com/ramkadam/status/1504298538708381698?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1504298538708381698%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fmaharashtra%2Fmaharashtra-government-cancels-guidelines-over-holi-celebration-sgy-87-2845947%2F

See also  चिंता वाढली! भारतात Corona च्या नव्या व्हेरिअंटची एन्ट्री, मुंबईत XE आणि कप्पाची पहिली केस

राम कदम ट्वीटमध्ये काय म्हणाले होते? (What did Ram Kadam say in the tweet?)

“महाराष्ट्र सरकारचा एवढा टोकाचा हिंदू सणांना (Hindu festivals) विरोध का? आता पुन्हा त्यांनी होळी आणि रंगपंचमी (Holi and Rangpanchami) साजरी करण्यावर निर्बंध घातलेत आहो तुम्ही घाबरत असाल.. हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. आम्हाला कळते स्वतःची कशी काळजी घ्यायची. तुमचे निर्बंध गेले खड्ड्यात. तुमच्याच भाषेत काय उखाडायचे ते उखाडा. आम्ही आमचा हिंदू सण जल्लोषात साजरा करणारच,” असे राम कदम (Ram Kadam) ट्वीटमध्ये म्हणाले होते.

सावधान! ‘The Kashmir Files’ बद्दल तुम्हाला लिंक आलीय का? पोलिसांनी दिली ‘हि’ माहिती

See also  Nashik News : नाशकात कोरोनानंतर 'या' रोगाचे संकट! महिन्याभरात तब्बल 11 जणांचा मृत्यू

Share on Social Sites