
मुंबई l Mumbai :
विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांचा चित्रपट ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) सध्या बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत आहे. सोशल मीडियावर या चित्रपटासंबंधीत बरीच चर्चा सुरु आहे. चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या उत्सुकता पाहता याचा गैरफायदा सायबर गुन्हेगार (Cyber Criminals) घेत आहे.
‘द काश्मीर फाइल्स’च्या मोफत डाउनलोड लिंक (The Kashmir Files free download) पाठवून फसवणूक (Cyber Crime) केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. नोएडा पोलिसांनी (Noida Police) याबाबत माहिती देत लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. (‘The Kashmir Files’ WhatsApp scam)
काय सांगता! ४२ सेकंदात YouTuber ने केली तब्बल १ कोटी ७५ लाख रुपयांची कमाई; कसं झालं शक्य?
पोलिसांनी लोकांना ‘द काश्मीर फाईल्स’ चित्रपटाशी संबंधित कोणतीही लिंक सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) आल्यास क्लिक न करण्याचे आवाहन केले. हा एक प्रकारचा स्कॅम असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मोफत चित्रपट असल्याचे आमिष दाखवून लोकांना लिंक पाठवली जाते.
अशा अमिषाला बळी पडत लोक त्या लिंकवर क्लिक करतात. त्यानंतर हे सायबर गुन्हेगार वापरकर्त्यांचे फोन हॅक करून त्यांची बँक खाती रिकामे करतात.
भयंकर! Google वर ‘कॉल गर्ल’ सर्च केलं अन्…, पुढे जे घडलं ते वाचून बसेल धक्का
नोएडाचे अतिरिक्त पोलिस उपायुक्त रणविजय सिंह (Noida Additional Deputy Commissioner of Police Ranvijay Singh) यांनी सांगितले की, गेल्या २४ तासात जवळपास ३० लाख रुपयांच्या फसवणुकीच्या तक्रारी एका पोलिस ठाण्यात दाखल झाल्या.
अशा लिंकवर क्लिक केल्यानंतर युजरचे डिव्हाइस रिमोट लोकेशनवरून हॅक (User device remote location Hack) केले जाते व त्यांची बँक खाती रिकामी केले जाते. हा प्रकार व्हॉट्सअॅपवर मोठ्या प्रमाणात दिसून आला आहे.
आपण ह्या बातम्या वाचल्यात का?
राज्यसभेचा रणसंग्राम होणारच! शिवसेना-भाजपात थेट लढत
6 मुले, अनेक बायका... करुणा शर्मा घेऊन येताय प्रेमकहाणीवर पुस्तक; भाभीजींचा हल्ल...
हिरकणी गावाला 21 कोटीचा निधीसह मुख्यमंत्री शिंदेंच्या विधानसभेत 'या' तीन मोठ्या ...
Video : बाईकला ट्रॅक्टरचा सायलेंसर, नंबर प्लेटच्या जागी “बोल देना पाल साहब आये थ...